मोहोळ / संजय आठवले : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या सुटकेमुळे मोहोळच्या राजकारणाची समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आसून आहेत. Solapur Dhoble Patil will change the political equation in Mohol due to the release of Ramesh Kadam
माजी आमदार रमेश कदम यांनी २०१४ मध्ये मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून लढवली होती. त्यांना नवखा मतदार संघ असतानाही माजी आमदार राजन पाटील अनगरकर अन रष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी त्यांना अवघ्या सोळा दिवसांत रमेश कदम यांनी निवडून आनले. त्यापूवी प्रा. लक्ष्मण ढोबळे हे मोहोळचे आमदार होते. प्रा. ढोबळे व कदम यांचे चांगले संबंध होते. रमेश कदम आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष झाले. नंतर महात्मा फुले सुत मिलवर रमेश कदम यांच्या उपस्थितीत कार्यकत्याचा मेळावाही घेण्यात आला होता. त्यानंतर प्रा ढोबळे यांच्या कारकीर्दीत महामंडळाचा कर्ज वाटपाचा मोठा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ वाढवण्यासाठी मोहोळ शहरातील घाटूळे मंगल कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळेपासूनच कदमाचे मोहोळ मतदार संघात मंगल व्हायला सुरुवात झाली.
ढोबळे यांचा कालावधी संपत आला होता अन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मालकांना नवीन माणूस पाहिजे होता. कदमांनी मोहोळची विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी आपल्या दूतामार्फत प्रयत्न चालू केले. वरच्या पातळीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व कदमांचा मैत्री संबध असल्याचे ऐकीवात आहे. तसेच मातंग समाज अभ्यास आयोगाचेही कदम अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांची व अजित पवारांच्या संबंधांची चर्चा होतीच. त्यामुळे फक्त स्थानिकांच्या होकाराची गरज होती तो त्यांनी मिळवलाअन कदमांचे तिकीट जाहीर झाले.
रमेश कदम यांना ६२१२० मते मिळाली अन ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार झाले तर भाजपाचे संजय क्षिरसागर यांना ५३७५३ मते मिळाली शिवसेनेचे मनोज शेजवाळ यांना ४२४७८ येवढ मत मिळाली होती तर प्रा ढोबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बडखोरी करीत अपक्ष निवडून लढवली. त्यांना १२०१४ मतावर समाधान मानावे लागले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रमेश कदमांनी नव्या जोमाने नव्या उत्साहाने मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या अन विकास कामाचा धडाका लावला. मागेल तेथे रस्ता तयार करून देणे विंधन विहिरी मारून देणे. त्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले अशा परिस्थित महात्मा फुले सुत मिलची निवडणूक लागली अन कदमांनी त्यात उडी घेतली. यातच ढोबळे – कदम संघर्ष सुरु झाला. इकडे कदमांची लोकप्रियता वाढत होती अन तिकडे मुंबईतून महामंडळाच्या भ्रष्टाचाराचे रकाने छापून येत होते अन मतदार संघात लोकप्रियता वाढत असतानाच कदमांना अपहार प्रकरणी अटक झाली. सात साडेसात वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना जामीन मंजूर झाला.
मागच्या निवडणुकीत रमेश कदम यांनी जेलमध्ये असतानाही पंचवीस हजार मते मिळवली होती. आता त्यांची कोणत्या पक्षाशी जवळीक होणार ? अन कोणत्या पक्षातून उमेदवारी दाखल करणार हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांची जवळीक आहे. मागच्या महिन्यात त्यांना सोलापूर येथे आणण्यात आल्यानंतर त्याची भेट व चर्चाही झालेचे समजते. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील दादा त्यांना संधी देणार का ? अन दिली तरी त्यांना नाकारलेल्या पक्षातून ते उभे राहणार का ?
भाजपाचे ढोबळे कदमांचा मेळ लागू देतील का ? अन जर का मागील लोकप्रियतेच्या जोरावर कदमांनी निवडणूक लढवली तर मालकांना अन प्राध्यापक ढोबळे यांच्याही अडचणीत भर पडणार असे दिसत आहे. त्यामुळे रमेश कदम यांच्यामुळे मोहोळच्या राजकारणाची समीकरणे बदलणार हे मात्र निश्चित आहे.