सोलापूर : बेगम पेठ पोलीस चौकी येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून एमआयएमचे माजी गटनेते रियाज खरादी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. Shinde group MIM accuses Riyaz Kharadi-Manish Kalje of open space case
या कारणावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख काळजे यांनी रियाज खरादी यांचा बंदोबस्त करू असे सांगितले होते त्याला उत्तर म्हणून पुन्हा खरादी यांनी आम्ही कोणाला घाबरत नाही काय करायचे करा असे उत्तर दिले आहे. यावर काळजे यांनी रियाज खरादी हे मनोरुग्ण आहेत आरोग्य खाते आमच्याकडे आहे, त्यांचा तिकडे बंदोबस्त करूच असे ठणकावून सांगितले आहे.
बेगम पेठ येथील महापालिकेच्या कोण्या जागेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. यासंबंधी तेथे याची डिजिटल लावण्यात आले आहॆ. डिजिटल लावल्याची माहिती मिळताच महापालिकेचे पथक ते काढण्यासाठी बेगमपेठ येथे गेले होते मात्र डिजिटल मुख्यमंत्र्यांचा फोटो असल्यामुळे ते रिकाम्या हातानेच परत आले.
या प्रकरणावरून रियाज खरादी यांनी पालिकेच्या जागेत अतिक्रमण होत आहे. प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही. आयुक्ताने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी गोरगरीब नागरिकांसाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे, येथे कोणतेही अतिक्रमण करण्यात आलेले नाही. याउलट खरादी यांनीच येथे वडापावची गाडी टाकून अतिक्रमण केलेले आहे. असा आरोप करत खरादी यांच्यावर एक- दोन गुन्हे दाखल आहेत ते मनोरुग्ण आहेत. आमच्याकडे आरोग्य खाते आहे त्यांचा आम्ही तिकडे बंदोबस्त करू असे म्हटले आहॆ.
यावर रियाज खरादी यांनी एकनाथ शिंदे गटाच्या वतीने येथे डिजिटल लावून ही जागा हडपण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कोणतेही दोन नंबर धंदे करत नाही, आमचा बंदोबस्त कोणीही करू शकत नाही, कोणाला काय करायचे ते करू द्या, असे म्हणत आपण याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून हा सर्व प्रकार कानावर घातला असल्याचे सांगितले आहॆ. महापालिकेचा रस्ता असून आपण याप्रकरणी कायदेशीर लढाई लढणार आहोत आपण या प्रकरणांमध्ये कोणाचेही नाव घेतले नसल्याचेही यावेळी खरादी यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विवेकानंद प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात, केले नव जोडप्यांचे समुपदेशन
अक्कलकोट : अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानने सालाबादाप्रमाणे यंदाही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. वर्हाडी मंडळींच्या उपस्थितीत अकरा जोडप्यांचा रेशीम गाठी विविध धर्माचे धर्मगुरु, साधु संतांच्या दिव्य सानिध्यात उत्साहात बांधण्यात आले.
या विवाह सोहळ्याला वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, निलकंठ शिवाचार्य महास्वामी मैंदर्गी , श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी नागणसूर, पूज्य भंत बी.सारीपुत्र (चैत्यभूमी मुंबई), राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नंदगाव, मुस्लीम धर्मगुरु हजरतपाशा पिरजादे अक्कलकोट, अहमद अलम कादरी यांच्या दिव्य सानिध्यात तर वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जि.प.गटनेते अण्णप्पा बाराचारी, भाजपा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, इंद्रजित पवार, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष दिलीप सिध्दे, बाजार समितीचे माजी संचालक दिलीप पाटील, उपसभापती अप्पासाहेब पाटील, महेश हिंडोळे, प्रभाकर मजगे, राजशेखर कापसे, किसन जाधव, अप्पासाहेब बिराजदार, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष महिबूब मुल्ला, भाजपा ता.अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, मल्लिनाथ स्वामी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
शनिवारी (ता. 18 मार्च ) सायं.6.36 वाजता विवाह सोहळा संपन्न झाला. हा देखणा व नेटक्या नियोजनांचा साक्षीने झालेला विवाह सोहळा पाहण्यासाठी व वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी वर्हाडी मंडळी व मान्यवर उपस्थित होते. विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी व परिवाराच्यावतीने आयोजित विवाह सोहळ्याचे यंदाचे हे अकरावे वर्ष आहे.
सकाळपासूनच नव वधू-वरांसह, पाहुणे व वर्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आले. वर्हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रासह सौभाग्य अंलकार, शालू, नवरदेवास सफारीसह दोंन्ही वधू-वरांना हळदीचे कपडे व संसारपयोगी साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी शिरिष पाटील, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, सिध्देश्वर कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्या मंगलताई कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी,सुरेखा होळीकट्टी, सुरेखा कल्याणशेट्टी, सोनाली शिंदे, परमेश्वर यादवाड, महेश पाटील,दयानंद उबंरजे, सुरेश नागूर, राजकुमार झिंगाडे, स्वीय सहाय्यक धनंजय गाढवे, स्वामी विवेकानंद पतसंस्था प्रतिष्ठान चे प्रमुख अधिकारी चंद्रकांत दसले, प्रकाश पाटील, अप्पाशा पुजारी, नागेश कलशेट्टी, विपुल कडबगांवकर, महेश कापसे, मल्लिनाथ मजगे, बसवराज नंदीकोले, श्रीकांत झिपरे, दयानंद बमनळी, ऋषिकेश लोणारी, विश्वनाथ इटेनवरु, सिध्दाराम मठपती, शिवशरण वाले, प्रविण शहा, धिरज छपेकर, प्रदिप जगताप, अप्पू कौटगीमठ, रमेश उप्पीन, मलकण्णा कोगनूर, मल्लिनाथ झळकी, राजकुमार नागुरे, शिवराज बिराजदार, रेवणसिध्द बोरगाव, अशोक बिराजदार, दयानंद बिडवे, रमेश कापसे, श्रीशैल ठोंबरे, विक्रम शिंदे, नागराज कुंभार, प्रदिप पाटील, शंकर उणदे, कमलाकर सोनकांबळे, निजप्पा गायकवाड, धोंडप्पा बनसोडे, स्वामीनाथ घोडके, अविनाश पोतदार, विनोद मोरे, जगदिश बिराजदार, सचिन पवार, कांतू धनशेट्टी, बबलू कामनुरकर, छोटू पवार, अंबण्णा चौगुले, आलम कोरबू, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, सुनिल सावंत, सोमनाथ पाटील, विशाल उडचाण, शिवप्पा हिळ्ळी, संतोष आळगी, भिमा तोरणगी, दिपक जरीपटके, विनोद पवार, राहूल काळे, बालाजी मोरे, अप्पू काळे, संजय राठोड, स्वामीनाथ घोडके, शिवशंकर स्वामी, संकेत कुलकर्णी, राहूल वाडे, लखन झंपले, राहूल ढोबळे, चन्नय्या स्वामी, प्रकाश कळसगोंड, आणप्पा बिराजदार, विलास कोरे, अशोक येणगुरे, मल्लिनाथ मसुती, अतुल कोकाटे, निनाद शहा, निरंजन शहा, अमोल कोकाटे, मल्लिनाथ सोमेश्वर, विजय तडकलकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवर आणि महास्वामीजींचे स्वागत प्रतिष्ठानचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले. यावेळी उपस्थित महास्वामीजी आणि काही मान्यवरांनी वधू वरांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले. सोहळ्याचे सुत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. विवाह सोहळयाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
विवाह हा नवसंसाराचा दोन विचारांचा दोन मनांचा असला तरी संसाराचे गाढा हाकताना दोघातील सुसंवाद महत्त्वाचा आहे. यामुळे घरात शांती व सौख्य लाभत असून नवसंसार नेटाने चालविण्यासाठी वडिलधारी मंडळीचा आशीर्वाद व गुरुजनांच्या आशीर्वाद घेवून सुरुवात केली पाहिजे, ते विवेकानंद प्रतिष्ठानने सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने घडवून आणल्याचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नंदगाव, पूज्य भंत बी.सारीपुत्र (चैत्यभूमी मुंबई), माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी समुपदेशन करताना सांगितले.