मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या 7 दिवसांपासून सुरु असलेला संप अखेर मागे घेतला आहे. संघटनेचे नेते विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली आहे. Old pension scheme The strike of the employees that has been going on for seven days is announced तसेच जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन आपल्याला सरकारने दिल्याचे काटकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, असे आवाहन काटकर यांनी केले. तसेच सरकारच्या समितीला आम्ही पूर्ण सहकार्य करणार, असे त्यांनी म्हटले.
संपकाळात जी काही कामं रखडली होती. ती सर्व कामे आता प्राधान्याने पूर्ण करणार आहोत. जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सरकारकडून आम्हाला लेखी आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे आम्ही संप मागे घेत आहोत. सरकारच्या समितीला पूर्ण सहकार्य करणार, असेही काटकर यांनी सांगितले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं. उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे.
Maharashtra | The issue can only be resolved through discussion, yesterday CM announced a 3-member committee to submit recommendations report within 3 months. This will give us a long-term solution: Deputy CM Devendra Fadnavis on 'Old Pension Scheme'
(file pic) pic.twitter.com/XUetWN5280
— ANI (@ANI) March 15, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विधान परिषदेतले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषद सभापतींना पत्र लिहून पेन्शन नाकारत असल्याचं म्हटलं आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नसल्याने आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या मोहीमेमध्ये सहभागी होत त्यांना पेन्शन घेण्यास नकार दिलेला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पेन्शन नाकारली आहे. शिक्षकांनी जुनी पेन्शन मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
गेले सात दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू होते. सरकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याने सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता. तसेच अनेक कामे रखडली होती. आरोग्यव्यवस्था देखील कोलमंडली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. झालेली बैठक यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उद्या मंगळवारपासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याची माहिती संघटनेचे विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली आहे.
¤ सरकारी रूग्णालयात कंत्राटी पध्दतीने पदभरती
शासकीय रूग्णालयातील ‘गट क’ आणि ‘गट ड संवर्गातील 5 हजार 56 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. यासाठी 9 कंपन्याची निवड करण्यात आली आहे. तसेच यासाठी येणाऱ्या 109 कोटी 52 लाख रूपये खर्चास सरकारने मंजुरी दिली आहे.