● जवळपास 12 फूट लांब आणि 10 फूट रुंद
अक्कलकोट – मुंबईच्या जोगेश्वरीतील स्वामीभक्त कलाकार ओंकार वाघ यांनी सुमारे ४०,००० पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेली स्वामींची प्रतिमा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शेजघर समोरील परिसरात स्थापीत करण्यात आलेली आहे. Akkalkot. Unveiling of Swami image made of 40000 Panchamukhi Rudrakshas in Bant Vriksha Temple
आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या रुद्राक्ष प्रतिमेचे अनावरण आज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. अक्कलकोटचे स्त्री रोग तज्ञ डॉ. आसावरी पेडगावकरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोलापूरचे धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांच्या हस्ते फीत कापून या रुद्राक्ष प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
प्रारंभी पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी कलाकार ओंकार वाघ, अभियंता शिवशरण हडलगी यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.
महेश इंगळे म्हणाले, ओंकार वाघ हे एक उत्तम कलाकार आहेत. त्यांची स्वामी भक्ती ही खूप मोठी आहे. या भक्ती प्रेमातूनच त्यांनी या ४०,००० पंचमुखी रुद्राक्ष पासून बनविलेली स्वामींची प्रतिमा साकारलेली आहे. ही प्रतिमा जवळपास १२ फूट लांब आणि १० फूट रुंदीची आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांना स्वामी दर्शनासोबतच या आगळ्यावेगळ्या प्रतिमेतून भाविकांना स्वामी दर्शनाचे नेत्रसुख नक्कीच अनुभवायला मिळेल, अशी आशा व्यक्त करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वामी दर्शनासोबतच या रुद्राक्ष प्रतिमेचेही दर्शन भाविकांनी घेऊन कृतार्थ व्हावे असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, संजय पवार, शिवशरण अचलेर, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, कलाकार ओंकार वाघ, कुणाल संसारे, हर्षल माने आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते. स्वामींची ही रुद्राक्ष प्रतिमा साकारण्यात कलाकार ओंकार वाघ यांना कुणाल संसारे, हर्षल माने, रोहन बाईक, वैष्णव मोरे, अमोल जाधव, गणेश नारकर इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले आहे, तर ही प्रतिमा वटवृक्ष मंदिरात स्थिरावण्याकामी महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शिवशरण हडलगी व सैफ फॅब्रिकेशनच्या वतीने दौलत नदाफ व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● गुढीपाडवा निमित्त मंदिरात महानैवेद्य, आरती संपन्न
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुढीपाडवा निमित्त मंदिरात महानैवेद्य, आरती संपन्न झाली.
नियमित अन्नछत्र मंडळाचा महाप्रसाद मंदिरात दाखविला जात असतो. बुधवारी हिंदू नववर्ष दिन चैत्र शु.२ शके १९४५ गुढीपाडवा निमित्त महानैवेद्य अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि महेश इंगळे यांच्या प्रमुख व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मंदिर समितीचे पुरोहित मोहन पुजारी, धर्मादाय उपआयुक्त सुनिता कंकणवाडी, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, उद्योजक सचिन किरनळ्ळी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रा.नागनाथ जेऊरे, रवि कदम, अमर पाटील, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, बाळासाहेब घाटगे, संतोष जमगे व निखील पाटील, प्रवीण घाडगे, दीपक जरीपटके, श्रीपाद सरदेशमुख, स्वामीनाथ लोणारी, सिध्दाराम कुंभार, सागर दळवी, खाजप्पा झंपले, प्रसाद सोनार, संतोष पराणे, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, रवि मलवे, संजय पवार, संजय पाठक यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
□ उड्डान पुलाची आवश्यकता, स्वामी भक्तांतून मागणी
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दिवसेनदिवस स्वामी भक्तांच्या गर्दीचे प्रमाण वाढत चाललेले आहे.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शनाला येण्याकरिता व महाप्रसादाकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडे जाण्याकरिता उड्डान पुलाची आवश्यकता असून याकरिता नगरपरिषदेकडून अन्य योजनेतून निधी उपलब्ध होत नसेल तर ‘मुफ्रा’ कडून कर्ज उपलब्ध करुन घेवून कर्जापोटी अनुदान रक्कम प्राप्त करुन त्यातून सदरचे काम पूर्ण करण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे.
नुकतेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची राज्याच्या मुख्य सचिवांकडे बैठक होवून विविध कामासह रक्कमेला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी हिरवा कंदील दिला असल्याने मुख्यमंत्री यांच्या शिखर समितीकडे मंजूरीकरिता लवकरच जाणार असून याठिकाणी देखील मंजूरी मिळणार आहे. तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला असून त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रश्न निकाली निघणार आहेत.
श्रींच्या दर्शनासाठी वाढत चाललेली दररोजची तरंगती लोकसंख्या व स्थानिक लोकसंख्या याचा विचार करता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळापर्यंत उड्डाण पूलाची गरज असल्याचे स्वामी भक्तांतून बोलले जात आहे. मंदिर ते अन्नछत्र मंडळकडे जाण्याचा सध्याचा रस्ता पाहता गर्दीमुळे स्वामी भक्तांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबतचा विचार करुन नगरपरिषदेकडून विकास निधी मागण्याकरिता सर्व योजना संपलेल्या आहेत, तर ‘मुफ्रा’कडून कर्जापोटी अनुदान रक्कमेतून सदरचे अद्यावत उड्डाणपूल करण्याची मागणी पुढे येत आहे.