सोलापूर – कुत्र्याच्या चावाने जखमी झालेल्या तरुणाचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मंगळवारी (ता. 21) पहाटे मृत्यू झाला. ही घटना मसले चौधरी (ता. मोहोळ) येथे घडली होती. यात आठवड्याच्या आत या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. Dog bites young man; Unfortunate death during the week Solapur Mohol Narkhed Government Hospital
बिभीषण दशरथ तांदळे ( वय ३१ रा. मसले चौधरी,ता. मोहोळ) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे . १६ मार्च रोजी रात्री नरखेड येथे एका कुत्र्याने याच्या पायास चावा घेतला होता. त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी नेण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पुन्हा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार दरम्यान पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 वाहन धडकेत जखमी झालेल्या अणदूरच्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू
सोलापूर – वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या अणदूर येथील तरुणाचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मंगळवारी (ता.21 ) पहाटे मृत्यू झाला.
सुहास महादेव घंटे (वय ३१ अणदुर ता. तुळजापूर) असे त्या मयताचे नाव आहे.तो १४ मार्च रोजी संध्याकाळी शातंबराई शमशाबाद येथे पायी निघाला असताना अज्ञात चार चाकी वाहनाने त्याला धडक दिली होती . यामध्ये डोक्यास, पायास मार लागून जखमी झाल्याने त्याला हैदराबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सोमवारी बेशुद्ध अवस्थेत (भाऊ) शंकर घंटे यांनी दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान आज मंगळवारी पहाटे मृत्यू झाला .
□ व्यवसायाकरिता मदत करतो म्हणून तीस लाखांची फसवणूक
सोलापूर : व्यवसायाकरिता मदत करतो तसेच लागणारे मशीन कमी दरात उपलब्ध करून देतो म्हणून तीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि.२७ जुलै २०२० ते आजतागायत पर्यंत फिर्यादी यांच्या ऑफिस जवळ घडली. याप्रकरणी राजकुमार सहदेव भूतनाळे (वय-४०,रा. मुपो.कुमठे,सोलापूर) यांनी विजापूर नका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अमर गजानन बाभुळकर,राजेंद्र शिंदे,महेश इरप्पा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना व्यवसायाकरिता मदत करतो म्हणून त्यासाठी लागणारे मशीन कमी दरात उपलब्ध करून देतो असे सांगून फिर्यादी भूतनाळे यांचा विश्वास संपादन केला. मशीनचे कोटेशन देऊन त्याबद्दल फिर्यादी कडून ऍडव्हान्स म्हणून पाच लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर कोटेशन वर मंजूर झालेले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मंजूर केलेले लोन वीस लाख रुपये आरटीजीएस द्वारे यशराज मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स कोल्हापूर या फार्मचे भागीदार वरील संशयित तिघा आरोपींनी जमा केलेली रक्कम असे एकूण २५ लाख रुपये, तसेच फिर्यादी यांची कार पाच लाखांची कार शिवाजीनगर पुणे येथून पासिंग करून देतो असे सांगून तीन धनादेश राजकुमार भूतनाळे यांच्याकडून घेतले. तसेच विलंब माफी बद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शंभर रुपयाचे फिर्यादी यांच्याकडून स्वाक्षरी केलेले कोरे स्टॅम्प घेऊन फिर्यादीची गाडी घेऊन ती अद्याप परत न देता शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेच्या पुढील तपास पोसई शेख हे करीत आहेत