सोलापूर – अज्ञात कारणावरून एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात पिकावर फवारणी करण्याचे कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावात बुधवारी (ता. 22) घडली. Akkalkot. Farmer commits suicide by taking insecticide medicine, Solapur Government Hospital
अशोक गिरीमल्लप्पा कुंभार ( वय 40 वर्ष, रा करजगी) असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञात कारणावरून त्यांनी बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात पिकांवर फवारणी करण्याची कीटकनाशक औषध पिले. त्रास होऊ लागल्याने त्यांना करजगी येथील सरकारी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत वडील गिरीमल्लप्पा यांनी दाखल केले असता त्यांचा बुधवारी रात्री उपचार दरम्यान मृत्यू झाला .
□ मुंढेवाडीजवळ दुचाकींच्या धडकेत एक ठार
सोलापूर – दोन मोटरसायकलींची समोर समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक दुचाकींस्वार जागीच ठार झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी – तडवळ रस्त्यावर आज गुरुवारी सकाळी घडली.
राजकुमार शरणाप्पा गंदले (वय 40 वर्ष, ता . मुंढेवाडी, अक्कलकोट ) असे त्या मयत मोटरसायकलस्वाराचे नाव असून ते आज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंढेवाडी गावाकडून तडवळकडे मोटरसायकल वरून निघाले असताना मुंडेवाडीपासून दीड किमी अंतरावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी ने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत भाऊ योगीराज यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून डोक्यात फोडली बीअरची बाटली
सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात अनोळखी तिघांनी बीअरची बॉटल फाेडून तरूणाला जखमी केले. यात कुणाल सुर्यकांत कसबे ( वय ३८, रा. मीरनगर, जुळे सोलापूर) हा तरूण जखमी झाला आहे. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कसबे हा हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन एका टेबलवर बसला होता. तेव्हा तीन अनोळखी तरूण तेथे येऊन दुसरीकडे बस, असे म्हणाले. कसबे आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर डोक्यात बिअरची बाटली फोडून कसबेला जखमी केले. कसबेच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक शेळके करीत आहेत.
● गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकाने महिलेवर केला अत्याचार
सोलापूर : घरगुती काम करण्यासाठी भाड्याने लावलेल्या रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्युसमध्ये गुंगीचे औषध घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली.
याप्रकरणी सुनील उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे (वय-३५,रा.हत्तुरे वस्ती) याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला आरोपी सुनील आचलारे हा नेहमी आपल्या रिक्षातून ने आण करत होता. यातूनच त्यांची ओळख झाली होती.
या ओळखीतून आरोपी सोबत पीडित महिला ही बोलत होती. पीडिता ही आजारी असताना आरोपीच्या रिक्षातून दवाखान्यात गेली. तेव्हा संशयित आरोपीने पीडितेला ज्यूसच्या बॉटलमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर पीडितेला लॉजवर नेऊन अत्याचार केला. पीडिता जेव्हा शुध्दीवर आली तेव्हा विचारल्यानंतर त्याने मी संबंध ठेवून त्यावेळी फोटो काढले आहेत, असे म्हणत पीडितेला ब्लॅकमेलिंग करू लागला.
शिवाय तुझे फोटो पतीला दाखवितो, नाहीतर मीच रेल्वे खाली जीव देतो अशी धमकी देऊन त्याने पीडितेशी विविध ठिकाणी जाऊन अत्याचार केले. शिवाय आतापर्यंत त्याने एक लाख रुपये पीडितेकडून विविध प्रकारे घेतले आहेत, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.