Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अक्कलकोट । शेतकऱ्याची कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या

Akkalkot. Farmer commits suicide by taking insecticide medicine, Solapur Government Hospital

Surajya Digital by Surajya Digital
March 23, 2023
in Hot News, सोलापूर
0
प्रेमविवाह केलेल्या तरुणाने घेतले पेटवून, झाला दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – अज्ञात कारणावरून एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात पिकावर फवारणी करण्याचे कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावात बुधवारी (ता. 22) घडली. Akkalkot. Farmer commits suicide by taking insecticide medicine, Solapur Government Hospital

 

अशोक गिरीमल्लप्पा कुंभार ( वय 40 वर्ष, रा करजगी)  असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अज्ञात कारणावरून त्यांनी बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात पिकांवर फवारणी करण्याची कीटकनाशक औषध पिले. त्रास होऊ लागल्याने त्यांना करजगी येथील सरकारी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत वडील गिरीमल्लप्पा यांनी दाखल केले असता त्यांचा बुधवारी रात्री उपचार दरम्यान मृत्यू झाला .

 

□ मुंढेवाडीजवळ दुचाकींच्या धडकेत एक ठार

 

सोलापूर – दोन मोटरसायकलींची समोर समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक दुचाकींस्वार जागीच ठार झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी – तडवळ रस्त्यावर आज गुरुवारी सकाळी घडली.

राजकुमार शरणाप्पा गंदले (वय 40 वर्ष, ता . मुंढेवाडी, अक्कलकोट ) असे त्या मयत मोटरसायकलस्वाराचे नाव असून ते आज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंढेवाडी गावाकडून तडवळकडे मोटरसायकल वरून निघाले असताना मुंडेवाडीपासून दीड किमी अंतरावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी ने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत भाऊ योगीराज यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून डोक्यात फोडली बीअरची बाटली

 

सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात अनोळखी तिघांनी बीअरची बॉटल फाेडून तरूणाला जखमी केले. यात कुणाल सुर्यकांत कसबे ( वय ३८, रा. मीरनगर, जुळे सोलापूर) हा तरूण जखमी झाला आहे. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कसबे हा हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन एका टेबलवर बसला होता. तेव्हा तीन अनोळखी तरूण तेथे येऊन दुसरीकडे बस, असे म्हणाले. कसबे आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर डोक्यात बिअरची बाटली फोडून कसबेला जखमी केले. कसबेच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक शेळके करीत आहेत.

 

● गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकाने महिलेवर केला अत्याचार

सोलापूर : घरगुती काम करण्यासाठी भाड्याने लावलेल्या रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्युसमध्ये गुंगीचे औषध घालून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली.

याप्रकरणी सुनील उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे (वय-३५,रा.हत्तुरे वस्ती) याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला आरोपी सुनील आचलारे हा नेहमी आपल्या रिक्षातून ने आण करत होता. यातूनच त्यांची ओळख झाली होती.

 

या ओळखीतून आरोपी सोबत पीडित महिला ही बोलत होती. पीडिता ही आजारी असताना आरोपीच्या रिक्षातून दवाखान्यात गेली. तेव्हा संशयित आरोपीने पीडितेला ज्यूसच्या बॉटलमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर पीडितेला लॉजवर नेऊन अत्याचार केला. पीडिता जेव्हा शुध्दीवर आली तेव्हा विचारल्यानंतर त्याने मी संबंध ठेवून त्यावेळी फोटो काढले आहेत, असे म्हणत पीडितेला ब्लॅकमेलिंग करू लागला.

शिवाय तुझे फोटो पतीला दाखवितो, नाहीतर मीच रेल्वे खाली जीव देतो अशी धमकी देऊन त्याने पीडितेशी विविध ठिकाणी जाऊन अत्याचार केले. शिवाय आतापर्यंत त्याने एक लाख रुपये पीडितेकडून विविध प्रकारे घेतले आहेत, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

 

Tags: #Akkalkot #Farmer #commits #suicide #insecticide #medicine #Solapur #Government #Hospital#अक्कलकोट #शेतकरी #करजगी #कीटकनाशक #औषध #आत्महत्या #शासकीय #रुग्णालय
Previous Post

अक्कलकोट । वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

Next Post

सोलापूर । तिन्ही तपास पथकांचा अहवाल एकच, तो ‘प्लॅस्टिक’चा नव्हे; ‘फोर्टिफाईड’ चा तांदूळच

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । तिन्ही तपास पथकांचा अहवाल एकच, तो ‘प्लॅस्टिक’चा नव्हे; ‘फोर्टिफाईड’ चा तांदूळच

सोलापूर । तिन्ही तपास पथकांचा अहवाल एकच, तो 'प्लॅस्टिक'चा नव्हे; 'फोर्टिफाईड' चा तांदूळच

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb   Apr »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697