पंढरपूर : चैत्री यात्रा एकादशी रविवारी ( दि. 02 एप्रिल) संपन्न होत आहे, या यात्रेला येणा-या भाविकांना सुलभ व जलद गतीने दर्शनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच दर्शनरांगेत बॅरीकेटींग करणे, कायमस्वरूपी पत्राशेड येथे जादा तात्पुरते पत्राशेड उभारणे, या दर्शनरांगेत मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, लाईव्ह दर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. Pandharpur Solapur will provide easy and fast darshan arrangement to devotees during Chaitri Yatra
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची चैत्री यात्रा 2023 नियोजनाबाबतची सभा शनिवारी सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न संपन्न झाली. यावेळी औसेकर बोलत होते.
यावेळी या सभेस सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखा अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या बैठकीत आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती, देणगी व्यवस्थेकामी जादा स्टॉल, स्वच्छता व्यवस्थेकामी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे, उपजिल्हा रूग्णालयामार्फत व स्वयंसेवी संस्थेमार्फत दर्शनमंडप येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगेतील भाविकांना दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी खिचडी, लिंबू सरबत, ताक/मठ्ठा मोफत वाटप करणे, पुरेसा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व्यवस्था करण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 2 व सायंकाळी 7.30 ते 9 या वेळेत मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.
चैत्र शुध्द एकादशी (दि.02एप्रिल) दिवशी श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणी मातेची नित्यपूजा पहाटे 4 ते 5 या वेळेत अनुक्रमे मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) व ॲड.माधवी निगडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
चैत्री यात्रेतील सर्व परंपरांचे पालन करण्यात येणार आहे. भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येनार आहेत. त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
○ खुशखबर… 100 टक्के पैसे परत मिळणार
पेटीएमने ग्राहकांसाठी एक योजना आणली आहे. यामध्ये त्यांनी ट्रेन तिकीट रद्द केल्यावर ग्राहकांना 100 टक्के रिफंड मिळणार असल्याचा दावा केला आहे. रेल्वेचे तिकीट रद्द केल्यानंतर त्यावर पेनल्टी लागते. पण आता तिकीट कॅन्सल केल्यानंतर पेनल्टी न लागता 100 टक्के रिफंड मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. चार्टिंग करण्यापूर्वी किमान 6 तास आधी तिकीट रद्द केल्यास ग्राहकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत केले जातील.