Friday, September 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

वागदरीतील ग्रामदैवत परमेश्वर यात्रेत थरार; रथाच्या दगडी चाकाखाली सापडून दोघे ठार

Thrilling in Yatra to village deity Parameshwara in Vagdari; Akkalkot Solapur, two people were found under the stone wheel of the chariot

Surajya Digital by Surajya Digital
March 27, 2023
in Hot News, सोलापूर
0
वागदरीतील ग्रामदैवत परमेश्वर यात्रेत थरार; रथाच्या दगडी चाकाखाली सापडून दोघे ठार
0
SHARES
696
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी ( ता.26) सायंकाळी रथोत्सवात मोठी दुर्घटना घडली. रथाचा लोखंडी रॉड (अक्सल) अचानकपणे तुटले. त्यामुळे पुढचे दगडी चाक निखळले. त्या निखळलेल्या चाकाखाली सापडून दोघा भाविकांचा मृत्यू झाला तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. Thrilling in Yatra to village deity Parameshwara in Vagdari; Akkalkot Solapur, two people were found under the stone wheel of the chariot

या दुर्दैवी प्रसंगामुळे गावावर शोककळा पसरली असून यात्रा थांबवण्यात आली. गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर गाडीवडर (वय ६८) व ईरप्पा (संजय) गिरमल नंदे (वय ३४, दोघे रा. वागदरी) या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे जखमी झाले.

निखळलेल्या दगडी चाकाखाली सापडल्यानंतर मंजूळकर व नंदे हे गंभीर जखमी झाले. त्याच अवस्थेत त्यांना उपचारासाठी अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. रथोत्सवाप्रसंगी हजारो भक्तांची उपस्थिती होती. रथ मंदिराकडे जाऊन बसस्थानककडे येताना ही दुर्घटना घडल्याचे समजते. यावेळी रथ जागीच थांबवण्यात आला. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात रथोत्सव सुरू होता. या धार्मिक कार्यक्रमामध्ये रथाच्या पुढच्या चाकातील पहार अचानकपणे निसटली. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य कार्यक्रम रथ ओढणे हा असतो.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढतात. सुमारे १२ फूट रुंद असलेल्या रथाला गोलाकार दगडी चाके आहेत. रथ ओढणे या धार्मिक विधीवेळी “परमेश्वर महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या जातात व स्थावर भाविक खारीक व इतर प्रासादिक वस्तूंची उधळण करत असतात. जयजयकार करीत रथोत्सव पुढे जात असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील नाटक व कुस्ती सह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

 

मयत गंगाराम हे भाजीपाला व्यवसाय करून आपली उपजीविका करत होते. त्यांना दोन भाऊ, पत्नी, तीन मुली, दोन मुले आहेत. मयत ईरप्पा ऊर्फ संजय हे वागदरीतील सिध्दगंगा ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील व एक भाऊ, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या
पोलीस व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले.

Tags: #Thrilling #Yatra #village #deity #Parameshwara #Vagdari #Akkalkot #Solapur #two #people #found #stonewheel #chariot#अक्कलकोट #वागदरी #ग्रामदैवत #परमेश्वर #यात्रा #थरार #रथ #दगडीचाक #सापडून #दोघे #ठार
Previous Post

बार्शी नजीक अपघातात एक जण जागीच ठार , ट्रक चालकावर गुन्हा

Next Post

अभिनेत्री आकांक्षा दुबेची हत्याच; बेपत्ता गायकावर गुन्हा दाखल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अभिनेत्री आकांक्षा दुबेची हत्याच; बेपत्ता गायकावर गुन्हा दाखल

अभिनेत्री आकांक्षा दुबेची हत्याच; बेपत्ता गायकावर गुन्हा दाखल

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb   Apr »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697