○ १४५ कारखान्यांचे गाळप संपले, १५६१ कोटी रुपये थकले
• सोलापूर : शेतकऱ्यांचे राजवाडे अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील २१० पैकी १४५ साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस समाप्तीनंतर आपापली धुराडी बंद केली असली तरी एफआरपीच्या माध्यमातून देय असलेला १५६१ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या घामाचा दाम थकवला आहे. The season is over; FRP extended, Baliraja Khangal, Sugar factory farmers strained crores of rupees कारखान्यांनी हंगाम संपवला तरी शेतकऱ्यांचा एफआरपी मर्यादेपेक्षा जास्त दिवस लांबवला आहे. ऊस बिल कधी मिळेल; याची कोणतीच खात्री नसल्यामुळे चिंतेत असणारा शेतकरी मात्र पुरता खंगला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.
एफआरपी थकवणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तंगवणे; त्यावर शासकीय यंत्रणेने कारवाईचे कागदी घोडे नाचवणे हे आता दरवर्षीचेच झाले आहे. एफआरपीचा नियम काहीही असला तरी कारखाने दरवर्षी कधीच नियमानुसार एफआरपी साखर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल कारखान्यांकडून दरवर्षी होणे हे ठरलेलेच झाले आहे.
यावर्षी राज्यातील १४५ कारखान्यांनी एफआरपीचे १५६१ कोटी थकवले आहेत. यापैकी २१ कारखान्यांनी ६० टक्के, ३९ कारखान्यांनी ८० टक्के इतकीच एफआरपी दिलेली असताना आयुक्त कार्यालयाने मात्र केवळ ३ च कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.
○ १०३५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १४५ कारखान्यांचे धुराडे बंद झाले आहे. आत्तापर्यंत राज्यात १०३९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन १०३५ लाख किंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९६ टक्के एवढा आहे. यंदा ऊस गाळपात सोलापूरचा डंका वाजला असला तरी सरासरी साखर उतारा मात्र ८.९५ टक्के एवढाच आहे. सरासरी साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून ११.४२ टक्के आहे. ऊस उत्पादनातील घटीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपासह उताऱ्यातही घट झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● नियम काय सांगतो ?
फडातील उसाची शेवटची ट्रक गेल्यानंतर १४ दिवसांनी एफआरपी देण्याचा कायदा आहे. मात्र कारखाने या नियमाला हरताळ फासत असून विलंब करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करीत व्याजासह रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.
● ऊस उत्पादनात झाली घट
चालू गळीत हंगामात राज्यात १०६ सहकारी व १०४ खासगी अशा एकूण २१० साखर कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. यंदा राज्याची दैनंदिन गाळप क्षमता वाढून प्रतिदिन ८ लाख ८४ हजार ९५० मेट्रिक टनावर पोहोचली आहे. तसेच कारखान्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे इतिहासातील उच्चांकी १५०० लाख टन ऊस गाळप होईल, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला असून हवामानातील चढउतारामुळे यावर्षी ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा फटका साखर उद्योगाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
● कोल्हापूरचा उतारा ११.४२ तर सोलापूरचा ८.९५ टक्के
राज्यात सरासरी साडेतीन ते पावणेचार महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. २४ मार्चपर्यंत कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांनी २२९.९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून २६२.६९ साखर लाख किंटल उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ११.४२ टक्के आहे. सोलापूर विभागातील ५० कारखान्यांनी २२९.३९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०५.२६ लाख किंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ८.९५ टक्के एवढाच आहे.
● सोलापूरचे गाळप उच्चांकी
कोल्हापूर जिल्ह्याने १ कोटी ४६ लाख ५२% २८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ कोटी ७० लाख ११४८२ किंटल साखर उत्पादित केली आहे. त्या पाठोपाठ सातारा जिल्ह्याने १०.२८ टक्के एवढा दुसऱ्या क्रमांकाचा उतारा मिळवला आहे. ऊस उत्पादनात सोलापूर जिल्ह्याने १ कोटी ८० लाख २७,५२८ मेट्रिक टन एवढे उच्चांकी गाळप करून १ कोटी ६१ लाख १५५०७ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ८.९५ टक्के एवढा आहे.