गांधीनगर : मोदी आडनावावरून केलेल्या विधानाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींचा जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. सुरत सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. Surat court grants bail to Congress leader Rahul Gandhi in defamation case यावेळी राहुल यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. यावरील पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. दरम्यान, पुढील सुनावणीत राहुल गांधीची शिक्षा रद्द होऊन खासदारकी रद्दला स्थगिती मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
आज स्वतः राहुल गांधी सुरत न्यायालयात उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अखेर राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झाला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे.
मानहानीच्या खटल्यात २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर १२ दिवसांनी राहुल गांधी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी गेले आहेत. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. दरम्यान, मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांना दिल्लीहून सुरतला रवाना होण्यापूर्वी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. राहुल गांधींबरोबर प्रियांका गांधी, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुरतमध्ये आले आहेत.तसेच यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Complete details:—
• Surat Sessions court admits appeal of Rahul Gandhi,
• Grants bail in the criminal defamation case appeal,
• Two years sentence suspended till the disposal of appeal.
Notice issued on plea seeking stay of conviction. Next hearing on April 13.… pic.twitter.com/by7ZSdz9na
— Shantanu (@shaandelhite) April 3, 2023
राहुल गांधी यांच्या वतीने सुरत न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी आणि न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी अशा दोन याचिका राहुल गांधीनी न्यायालयात दाखल केल्या आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात आणि देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहे.
13 एप्रिल 2019 मध्ये राहुल गांधींनी एका रॅलीदरम्यान नीरव मोदी, ललीत मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का असते? असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री यांनी पूर्णेश मोदींनी त्यांच्याविरोधात कलम 499, 500 अंतर्गत आपराधिक मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.
मानहानीच्या प्रकरणावर सुनावणी देताना सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्यानंतर देशात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. देशभरातून याचा निषेध करण्यात आला होता.
दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ अनेक नेते सुरत न्यायालयात हजर राहत आहेत. मात्र कॉंग्रेस नेत्यांच्या गाड्यांची तपासणी करत चौकशी करुन गाड्या पुढे जाण्यास परवानगी दिली जात आहे. याप्रकारावर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. आता न्यायालयात राहुल गांधींचा जामीन मंजूर केला जाणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.