• अभिजित पाटील यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत
पंढरपूर – पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १८ जागेसाठी विक्रमी ११७ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे यंदा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अभिजित पाटील यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. Chances of Pandharpur Bazar Samiti going unopposed are bleak, 117 applications for 18 seats Patil Paricharak Bhalke Awatade Kale
सोमवारी (ता. ३ ) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्ष, गट, संघटना यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सहायक निबंधक कार्यालयात एकच गर्दी झाली होती. सत्ताधारी परिचारक गटासह विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील गट, आमदार आवताडे गट, विठ्ठल परिवार, बळीराजा शेतकरी संघटनासह विविध शेतकर्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. कमीत कमी दहा गुंठे शेती असणारा शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, असा नवीन नियम करण्यात आल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परिचारक गटाकडून हरिष गायकवाड, दिलीप चव्हाण, राजू गावडे, महादेव बागल, जयसिंग भुसनर, तानाजी पवार, संतोष भिंगारे, हरिभाऊ ङ्गुगारे, महादेव लवटे, नागनाथ मोहिते, शिवदास ताड, अभिजीत कवडे, पंडीत शेंबडे, वसंत चंदनशिवे, सचिन कुचेकर, यासिन बागवान, सोमनाथ डोंबे, श्रीमंत डांगे, शारदा अरूण नागटिळक व संजिवनी बंडु पवार आदींनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान व्यापारी मतदार संघातून केवळ डोंबे व बागवान यांचेच अर्ज दाखल झाले आहेत.
तर मनसेचे नेते दिलीप धोत्रे, विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी नेत्यांनी विठ्ठल परिवाराअंतर्गत एकत्र येत ७० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वतंत्रपणे सतरा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.अभिजित पाटील यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सदर निवडणुकीमध्ये लवचिक धोरण स्वीकारणार असल्याचे सांगत विरोधकांशी हातमिळवणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विठ्ठल परिवार व परिचारक यांच्यामध्ये युती होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र अभिजीत पाटील यांची ‘एकला चलो रे ‘ भूमिका असल्याचे चित्र आहे.