मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या पुष्पा सिनेमाने आपली चांगलीच छाप सोडली होती. आता पुष्पा 2 या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच आता ‘पुष्पा : द रुल’ या दुसऱ्या भागात काय रंजक असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. South actor Allu Arjun charged double the fee for Pushpaa 2 than the first
नुकताच या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. पुष्पा 2 मधील त्याचा लुक सुद्धा समोर आला आहे. यानंतर त्याच्या चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. पुष्पा सिनेमासाठी अल्लू अर्जूनने 45 कोटी रुपये मानधन घेतले होते. आता पुष्पा 2 साठी त्याने 85 कोटी रुपये मानधन आकारले आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा 2’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘पुष्पा द रुल’ या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतलं आहे. ‘पुष्पा 2’ हा सिनेमा 2023 किंवा 2024 च्या पहिल्या महिन्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी ‘पुष्पा 2’ हा सिनेमा सज्ज आहे. अल्लू अर्जुन, फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, धनंजय, राव रमेश, सुनील, अनसूया भारद्वाज आणि अजय घोष हे कलाकार ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, पुढील वर्षी 2024 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होईल.
Pushpa Raj's RULE spreads like a wildfire 🔥🔥#Pushpa2TheRule Glimpse trending Worldwide with 70M+ views and 2.75M+ likes 💥💥
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku #FahadhFaasil @ThisIsDSP @SukumarWritings @MythriOfficial @TSeries pic.twitter.com/PLcuPfKO9w
— Pushpa (@PushpaMovie) April 10, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
It's not a brand he wanted to start…it's a brand he was built in " PUSHPA GADI RULE " 🔥 @alluarjun #Pushpa2TheRule pic.twitter.com/4r9AnGHdjv
— Bunny – Youth Icon Of India (@BunnyYouthIcon) April 10, 2023
‘पुष्पा द राइज’ या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे ‘पुष्पा द रुल’ किती कमाई करू शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अल्लू अर्जुनने त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप शुभेच्छा दिल्या.
अल्लु अर्जुनचे स्टारचे इंस्टाग्रामवर एक नाही तर दोन अकाउंट आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनचे इंस्टाग्रामवर दोन अकाउंट आहेत, एक तुम्हाला माहिती असेल पण त्याने दुसरे अकाउंट सीक्रेट ठेवले आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की केवळ अल्लू अर्जुनच नाही तर इतर अनेक साऊथ आणि बॉलीवूड स्टार्स आहेत जे सोशल मीडियावर त्यांचे सिक्रेट अकाउंट चालवतात, ज्याची चाहत्यांना माहितीही नाही. अल्लू अर्जुन त्याच्या सीक्रेट इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या खास मित्रांसोबत चॅट करतो.
अल्लू अर्जुनचे चाहते इन्स्टाग्रामवर त्याचे सीक्रेट अकाउंट शोधू लागले असतील. अभिनेते या अकाऊंटवर त्याच्या मित्रांसोबत सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करतात. दुसरीकडे, त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर, तुम्हाला त्याच्या व्यावसायिक वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील, जे चाहत्यांनाही खूप आवडतात.