कुर्डुवाडी : कुर्डूवाडी येथील श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था आणि सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोद्वय विश्वधर्मा जन्मकल्याण जैन एकता महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. Solapur. Jain temple showered with flowers by helicopter; Kurduwadi in Jain Ekta Mahotsav excitement
कुर्डूवाडी येथील जैन मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शोभयात्र मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या कार्यक्रमांसाठी राज्यातील सात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
रविवारी (ता. ९) सकाळी ७ वाजता मंदिरावरील ध्वजारोहण राजेश गांधी, शोभायात्रा उद्घाटन महेश गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या मिरवणूक रथ बगी, अश्व, हत्ती व विविध सामाजिक संदेश देणारे फलक, बँड पथक, महिला, पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भगवान महावीराची प्रतिमा हत्तीवर ठेवण्यासाठी विलास जयकुमार दोशी व मंडपाचे ध्वजारोहण डॉ. विलास मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व्दार विशाल भारत पुर्वत तर जैन सन्मानचिन्ह संतोष हिरालाल जोशी यांच्या वतीने देण्यात आले होते.
यावेळी मुनीश्री १०८ सागर महाराज व मुनीश्री १०८ पुराण सागरजी महाराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन संदेश दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी
कुर्डूवाडी येथील जैन मंदिरावर व मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून सराफ व्यापारी चेतन शहा पत्नी वैशाली शहा, नम्रता शहा, प्रशांत शहा, ऋतुराज शहा, डॉ. समृद्धी शहा, यशराज शहा यांनी हेलिकॉप्टर मधून अनंतनाथ दिगंबर जैन मंदिरावर परिक्रमा करत जैन मंदिर व एकता रॅलीतील हत्तीवरती असलेल्या महावीरांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
यावेळी स्वागत अध्यक्ष सुहास शहा, गौरव अध्यक्ष डॉ. प्रवीण तांबोळी, डॉ. लकी दोशी, डॉ.संतोष दोशी, डॉ. निशांत शहा, प्रा.प्रमोद शहा, महेंद्र मेहता, संकेत दोशी, शितल तांबोळी, अॅड. प्रमोद पलसे, केतन संचेती, प्रकाश शहा, अनुप दोशी, प्रशांत धोका, अक्षय शेटे, रोहित पुरवत, जितेंद्र दोशी, विजयकुमार मेहता, अमोल दोशी, स्वप्निल फडे, महावीर दोशी, निखिल शहा, महावीर देशमाने, सोहम शहा, सौरभ दोशी, शुभम बुबणे, संदेश पालिया, बंडू भाळवणकर, सागरिका शहा, सायली शहा, वैशाली शहा, स्नेहा फडे, सारिका दोशी, प्रिया मेहता, मंगल संचेती किरण सुराणा,संगीता व्होरा, शैला बहिरशेठ, पुनम फडे, प्रणिता दोशी आदींनी परिश्रम घेतले.