Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘मिनी गोल्डन गँग‘ सक्रीय झाल्याने अक्कलकोट सहकार क्षेत्राच्या निवडणूक लागल्या

Ex-MLA Sidramappa Patil Sachin Kalyanshetty in Akkalkot Co-operative Area elections started as 'Mini Golden Gang' became active

Surajya Digital by Surajya Digital
April 11, 2023
in Hot News, सोलापूर
0
‘मिनी गोल्डन गँग‘ सक्रीय झाल्याने अक्कलकोट सहकार क्षेत्राच्या निवडणूक लागल्या
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

○ माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा आरोप

अक्कलकोट : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लावण्या करिता ‘मिनी गोल्डन गँग’ सक्रिय झाल्यानेच निवडणूक लागली आहे, शेतकर्‍यांच्या मंदिराची निवडणूक लावणार्‍यांना हद्दपार करा, असे आवाहन 85 वर्षीय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केलंय. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची साथ लाभत असल्याचे म्हटलंय. Ex-MLA Sidramappa Patil Sachin Kalyanshetty in Akkalkot Co-operative Area elections started as ‘Mini Golden Gang’ became active 

ते सोमवारी (ता. 10) आपल्या निवासस्थांनी साखर कारखाना, व बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने साखर कारखाना सभासद, ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्थेचे संचालकाच्या मतदार संवाद सभेत बोलत होते.

दरम्यान श्री स्वामी समर्थांचे प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते स्वामीरावकाका पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी, अप्पू परमशेट्टी, सिध्दप्पा गड्डी, अप्पासाहेब बिराजदार, जयशेखर पाटील, संजीवकुमार पाटील, अप्पासाहेब पाटील, सुनील बिराजदार, गिरमल गंगोडा, भिमाशंकर धोत्री, शिवपुत्र धानशेट्टी, दिलीपराव पाटील, महादेवराव पाटील, बाबूशा करपे, डॉ. शिवशरण काळे, शिवशरण जोजन, राजेंद्र बंदिछोडे आदीजण उपस्थित होते.

 

सिद्रामप्पा पाटील म्हणाले की, गत बाजार समितीच्या सभापती व संचालकांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. शेतकर्‍यांच्या हितार्थ संचालक मंडळ कार्यरत होते. पुढे देखील राहिल, असे सांगून अक्कलकोट व दुधनी बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल-तोलार मतदारांनी सज्ज व्हावेत.

साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असताना काही जागांवर निवडणूक लावून सहकारात राजकारण आणल्याचा आरोप पाटील यांनी करून गेल्या ६५ वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या ५० वर्षात सहकार क्षेत्रात कार्यरत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिलो, आहे. माझ्या जीवनात अनेक राजकीय चढ-उतार आले, जिव घेणे हल्ले झाले, मात्र श्री स्वामी समर्थांचा व तालुक्यातील तमाम शेतकर्‍यांच्या आशिर्वादाने आज जीवंत आहे असे सांगून, माझ्या बाजार समिती सभापती पदाच्या काळात अक्कलकोट बाजार समितीला व्यापक स्वरूप आणून त्या काळात बाजार समिती बसवेश्वर यार्डाच्या भव्य जागेत स्थलांतरीत करून एकाच ठिकाणी व्यापार, प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे राज्यातील पहिली बाजार समिती ठरल्याचे म्हटले.

पाटील म्हणाले, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळात अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील गावे,वाड्या, वस्त्या, तांडे यासह हम रस्त्यांना कोट्यावधीचा निधी आणण्यात आला, अजून देखील ते आणत आहेत. मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी सतत कार्यरत असणारे नेतृत्व म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या व माझ्या नेतृत्वाखाली सहकारातील या निवडणूक होत आहेत. तरी या तिन्ही संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी शेतकरी, कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावेत, असे आवाहन सिद्रामप्पा पाटील यांनी केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही मला का तुला संधी यामध्ये निवडणूक लागलेली असून अक्कलकोट बाजार समिती व कारखान्याची निवडणूक विरोधकांनी लावून फायरिंग सेफ करण्याचा प्रयत्न केला आहे. युध्दाच्या आगोदर करण्यात येणारी ही क्रिया आहे. या माध्यमातून दुधनी बाजार समिती ही विरोधक पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची मनसुबे आहेत. ही उधळण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या तिन्ही सहकारी संस्थेवर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व माझ्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सजग राहावेत, असे सांगून कल्यणशेट्टी यांनी दुधनी बाजार समिती निवडणूक करिता सिद्रामप्पा पाटील यांना अक्कलकोट बाजार समिती व कारखान्याची निवडणूक लावून गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

 

या तिन्ही निवडणुकीच्या दरम्यान विरोधक अफवा पसरविणे, गैरसमज निर्माण करणे आदी प्रकारे कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होईल याकडे दुर्लक्ष करून या तिन्ही संस्थेवर भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.

यावेळी अप्पासाहेब बिराजदार व संजीवकुमार पाटील यांनी साखर कारखाना व बाजार समितीची निवडणूक लादणार्‍या विरोधकांवर तोफ डागत बिराजदार यांनी साखर कारखाना व बाजार समितीच्या कारभाराबाबत विरोधकांची टिका बिनबुडाची असल्याचे सांगून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या तिन्ही संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन बिराजदार यांनी केले.

 

तर संजीवकुमार पाटील यांनी बाजार समितीचा सभापती म्हणून शेतकरी व व्यापारी, हमाल-तोलार यांच्या हितार्थ केलेल्या कामाबाबत माहिती सांगून विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे असल्याचा आरोप केला.

 

यावेळी पुढे बोलतना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोपानकाका निकते यांनी सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या तिन्ही संस्थेच्या निवडणूकीत त्यांनी देतील त्या उमेदवारांना भरघोष मतानी विजय करण्याचे आवाहन करून विरोधकांच्या कार्यप्रणालीवर कडाडून टीका निकते केली.

 

 

○ ८५ वर्षीय सिद्रामप्पा पाटील यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची साथ

गेल्या अनेक वर्षापासून सहकारात सिद्रामप्पा पाटील हे कार्यरत आहेत. शेतकर्‍याकरिता आजवर त्यांनी केलेल्या कामामुळेच तालुक्यातील सहकारात ते यशस्वी झाले. ते नेहमी म्हणतात शेवटच्या श्वासांपर्यत शेतकर्‍यांची सेवा करणार! युवक आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सहकारात त्यांना साथ देत असल्याने भाजपाचे सर्वच कार्यकर्ते व शेतकरी बांधव या निवडणुकीच्या निमित्ताने या तिन्ही संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी वज्रमूठ बांधली आहे.

यावेळेस धनराज बिराजदार, सुधीर मचाले, सिध्दाराम बिराजदार, दिलीपराव शावरी, गुणवंत धर्मसाले, संजीव पाटील, अभिजीत सवळी, स्वप्नील बिराजदार, नागनाथ व्हनमुर्गे, गुरू पाटील , शिवानंद पेडसंगे, मल्लिनात ढब्बे, मलकण्णा जनगोंडा, बसवराज कलशेट्टी, भीमाशंकर विजापुरे, अप्पाशा किवडे, अशोक वर्दे, बाबासाहेब पाटील, श्रीमंत मनगुंदी, महादेव रोडगे, श्रीमंत कुंटोजी, बाबू कॅर, लक्ष्मीबाई पोमाजी, मल्लिनाथ उणदे, शेकप्पा कलघुटगे, महेश धर्मसाले, गोटू मंगरूळे, महादेव महाजन, श्रीशैल मंगरूळे, प्रकाश पोमाजी, मल्लिनाथ भासगी, राहूल काळे यांच्यासह साखर कारखाना सभसाद, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, पंचकमेटी अध्यक्ष आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मल्लिनाथ दुलंगे यांनी केले. तर आभार भिमाशंकर विजापुरे यांनी मानले.

Tags: #Ex-MLA #SidramappaPatil #mla #SachinKalyanshetty #Akkalkot #Co-operative #Area #elections #started #MiniGoldenGang #became #active#मिनीगोल्डनगँग #सक्रीय #अक्कलकोट #सहकार #क्षेत्र #निवडणूक #माजीआमदार #सिद्रामप्पापाटील #आरोप
Previous Post

शिवसेना भवन, पक्ष निधीसाठी कोर्टात याचिका; उध्दव ठाकरेंच्या अडचणीत वाढ

Next Post

वेळापूर । बैलगाड्याचा थरार परत एकदा चिमण्याने प्रथम क्रमांक मिळवला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
वेळापूर । बैलगाड्याचा थरार परत एकदा चिमण्याने प्रथम क्रमांक मिळवला

वेळापूर । बैलगाड्याचा थरार परत एकदा चिमण्याने प्रथम क्रमांक मिळवला

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar   May »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697