वेळापूर : वेळापूर तालुका माळशिरस येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने मोठ्या संख्येने बैलगाडा स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. महादेव देवालय ट्रस्टच्या पटांगणावर झालेल्या बैलगाड्या शर्यतीचे उद्घाटन मैदानासाठी सौजन्य अशोकराव माने देशमुख, वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव, काशिनाथ आडत यांच्या हस्ते करण्यात आले. full of time The thrill of the bullock cart once again the sparrow won the first place! Malshiras Solapur
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे ,उपसरपंच तानाजी काका चव्हाण, यात्रा कमिटी अध्यक्ष मिलिंद सरतापे, कार्याध्यक्ष विनायक माने, खजिनदार जावेद मुलाणी, उपाध्यक्ष धनंजय शिवपूजे ,यांच्यासह ग्रामपंचायततीचे सदस्य, यात्रा कमिटीचे कार्यकारणी सदस्य, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये शौकिनांना बैलगाड्यांचा थरार पहावयास मिळाला, बैलगाड्याचा रणसंग्राम वेळापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा ठरला आहे. यामध्ये रामकृष्ण जाधव यांच्या चिमण्या ग्रुप बैलगाडा वेळापूर याने तीन नंबर फाटीवर पळून प्रथम क्रमांकाचे स्प्लेंडर मोटरसायकलचे बक्षीस मिळवले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
▪︎ दुसरा क्रमांक मानकरी:-रेणुका प्रसन्न करुळे,
३ क्रमांकाचा मानकरी:-काशीविश्वेश्वर बारामती,
चौथा क्रमांकाचा मानकरी:-बिरू घुले माळशिरस,
पाचवा क्रमांक मानकरी:-हरी पवार ठाकूरबुवा,
सहावा क्रमांकाचा मानकरी:-राणा ग्रुप नेवरे
सातव्या क्रमांकाचा मानकरी:-नगरसेवक अशोक वाघमोडे आदिंनी बक्षिसे मिळवली. या सर्व विजेत्या स्पर्धकांचे गरुड बंगला येथे उत्तमराव जानकर यांच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मान करण्यात आला.
या बैलगाडा शर्यतीचे झेंडा धरण्याचे काम अग्निबापू चव्हाण, महेश देवकते, विशाल बोडरे, दीपक माने देशमुख यांनी केले तर पंच म्हणून रामकृष्ण जाधव ,काशिनाथ आडत, दादासाहेब घाडगे, मधुकर कदम, अमोल पनासे , अप्पाराव कांबळे, राजाभाऊ देवकते यांनी काम पाहिले.
बैलगाडा शर्यतीचे सुंदर असे समालोचन धनाजी वाघमोडे रणजीत सरवदे, धनाजी धांडोरे यांनी केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव, बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष रामकृष्ण जाधव,माजी जि प सदस्य शरद बापू मोरे दहिगाव, अशोकराव माने देशमुख, डॉ धनंजय साठे माणिक वाघमोडे, माणिक अण्णा चव्हाण, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच तानाजीकाका चव्हाण, यात्रा कमिटी अध्यक्ष मिलिंद सरतापे, कार्याध्यक्ष विनायक माने, खजिनदार जावेद मुलाणी, उपाध्यक्ष धनंजय शिवपुजे, काशिनाथबापू आडत,अजित बोरकर मधुकर कदम, संदीपतात्या माने देशमुख, दादासाहेब घाडगे, वेळापूर ग्रामपंचायत गटनेते संजयआबा मंडले, हनुमंत वायदंडे, राजाभाऊ शिंदे, ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष संजय देशपांडे यांची उपस्थिती होती.