● उध्दव ठाकरेंचा हल्ला, मुख्यमंत्र्यांचा सल्ला, चंद्रकांतदादांचा यू टर्न
मुंबई : बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना यांचा काहीही संबंध नाही, असे सांगून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा घोर अपमान केला आहे. Those who are carrying the thoughts of Balasaheb, resign from Patal or else you give Uddhav Thackeray Raj Thackeray Babri Masjid. हा अपमान सहन होत नसेल तर बाळासाहेबांचा विचार घेऊन गेलेल्यांनी सत्तेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू नये, एक तर चंद्रकांत पाटलांचा त्यांनी राजीनामा घ्यावा नाहीतर यांनी स्वतः मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, असा हल्ला उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन करून सल्ला दिल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तातडीने पत्रकार परिषद घेत यू टर्न मारला.
उध्दव ठाकरे म्हणाले, आमच्याकडच्या मिंधेंनी सत्तेसाठी लाचार होऊन लाळघोटेपणा केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप करत भाजपाचे पाय चाटायला गेले. आता त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अन्यथा मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आता हे कुणाला जोडे मारणार आहेत की स्वतःच जोड्याने आपलं थोबाड फोडून घेणार आहेत? कारण ते केवळ आणि केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत. त्यांनी काय चाटायचं ते चाटावं, आम्ही बघायलाही येणार नाही.
मात्र, एवढं बोलल्यावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ यांचं नेमकं हिंदुत्व काय आहे ?
एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत. आता मदरशांमध्ये जाऊन हे कव्वाली ऐकणार आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत. याचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय ? मी सांगतो की, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसं भाजपाने एकदा स्पष्ट करावं की, याचं नेमकं हिंदुत्व काय आहे ?. असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
○ चंद्रकांत पाटील यांचा खुलासा
मी साधा सरळ माणूस असून गरिबीतून आलो आहे. मी मुंबईकर असल्याने बाळासाहेबांचे मराठी माणसावर असलेले ऋण मी जाणतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे. बाळासाहेबांचा अनादर होईल असे माझ्या तोंडून काहीच निघणार नाही. संजय राऊत वारंवार बोलत असतात. पण बाबरी पाडताना ते कुठे होते? हाच मुद्दा माझा होता.
मुलाखतीत मी बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहेच. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेत सांगा की, बाळासाहेबांबद्दल अनादर नाही. म्हणून हा खुलासा करत आहे. बाबरीचा ढाचा पडताना विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात सगळे हिंदू होते. शिवसैनिक वगैरे भेद नव्हता. कुठल्या एका पक्षाने बाबरी पाडलेली नाही. उद्धव ठाकरे आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांना माझी भूमिका सांगेन.
○ राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
मनसेकडून राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी बाबरी मशीद पडली त्या दिवशी अर्थात ६ डिसेंबरची एक आठवण सांगितली आहे. “मला तो प्रसंग आठवतोय जेव्हा मी समोर खालच्या खोलीत बसलो होतो. दुपारची वेळ होती. बाबरी मशीद पडली होती. दीड-दोन तासांत एक फोन आला.
बहुधा टाईम्स ऑफ इंडिया की कुठून आला होता. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की इथे कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. पण भाजपाचे सुंदरलाल भंडारी म्हणतायत की हे सगळं आमच्या भाजपाच्या लोकांनी केलेलं नाहीये. हे कदाचित शिवसैनिकांनी केलं असेल. मी तिथे होतो. मी तुम्हाला सांगतो, त्याच क्षणी बाळासाहेब म्हणाले होते की जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की त्या वेळेला, त्या क्षणाला ती जबाबदारी अंगावर घेणं ही किती महत्त्वाची गोष्ट होती,” असे राज ठाकरे या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
पांडे म्हणाले की, स्व. रामचंद्र परमहंस आणि बाळासाहेबांमुळे ५,००० G शिवसैनिक बाबरीजवळ पोहोचले. शिवसैनिकांनी तिथले बॅरिकेट्स तोडले आणि आत जाऊन बाबरी पाडली. आजही शिवसैनिकांकडे तिथले दगड आहेत. त्या खटल्यात अनेक शिवसैनिकांची नावे आहेत. बाळासाहेबांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. आधी सरकार विरुद्ध बाळ ठाकरे असा खटला होता, जो पुढे सरकार विरुद्ध पवन पांडे असा चालला. या खटल्यातील प्रमुख आरोपींमध्ये १५ शिवसैनिकांची नावे होती. शिवसैनिकांनी त्यावेळी सांगितलं आम्हाला बाबरी पाडल्याची कोणतीही खंत नाही. चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं असल्याचे पवन पांडे ( बाबरी खटल्यातील प्रमुख आरोपी व शिवसैनिक) यांनी म्हटले .