मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असल्याचे समजत आहे. ते मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असे ते म्हणाले आहेत. BJP’s warning to Rahul Gandhi: Apologize to Savarkar, then set foot in Maharashtra, Congress’s response varied
काँग्रेस नेते राहुल गांधी हे लवकरच मुंबईत शिवसेना प्रमुख ठाकरेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीवर येणार असल्याचं वृत्त आल्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मात्र अशा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला नाही. हे वृत्त खोटं आहे असं म्हंटलयं. इकडे शिवसेनेनंही अधिकृत खुलासा केलेला नाही. भाजपानं मात्र राहुल गांधींनी सावरकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय त्यांना मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही अशी भुमिका जाहीर केली आहे. अलिकडेच राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मविआतही चांगलीच धूसपूस पाहायला मिळत असून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मात्र, राहुल यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन माफी मागितल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. यावर राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यासाठी बावनकुळेंच्या परवानगीची गरज नाही. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले आहे.
बावनकुळे यांनी हा इशारा दिलेला असतानाच, हिंदू राष्ट्र म्हणजे काय? तुमची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे? ही संकल्पना स्पष्ट करा. अशी भुमिका पटोलेंनी मांडली आहे.
नाना पटोले म्हणाले, “आपण हिंदुस्थानातच राहतो. हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने सांगावा. हिंदू राष्ट्र म्हणजे काय ते त्यांनी सांगावं. भाजप ज्यांना मानते त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती? ते त्यांनी स्पष्ट करावी. या देशात बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम राहतात. ते या देशात राहणार नाहीत अशी त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे काय? असा सवाल करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव मांडला. भाजपने हिंदुत्व सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सातत्याने केले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे.”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काँग्रेसचे सर्व नेते वज्रमूठ सभेला उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केले. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेची सगळी तयारी झालेली आहे. संजय राऊतही नागपुरात येणार आहे. सभेची जय्यत तयारी झालेली आहे.” असं पटोले म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता.13) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. “एकत्र मजबूत, आमच्या लोकांच्या चांगल्या, उज्वल आणि समान भविष्यासाठी आम्ही एकत्र आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींसोबत भेट घेतली आणि भविष्याबद्दल चर्चा केली.” असे ट्विट खर्गे यांनी केले.
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. तिन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली. दरम्यान, बुधवारी दिल्ली येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीचे आमंत्रण शरद पवार यांना देण्यात आले होते. परंतू महाराष्ट्रात काही कामे असल्याने पवार बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांनी वरीष्ठ नेत्यांची भेट घेतली.