¤ एकमेकांना वाचवण्याच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मंगळवेढा : सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. भीमा नदीत एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला व दोन मुलांचा समावेश आहे. Solapur. Gurkhas came to patrol; Four people got water burial in Bhima, Nepali family became Porke Mangalvedha Siddhapur बालूदमाई नेपाळी, मनसरादमाई नेपाळी, हिरदेश नेपाळी, नमुना नेपाळी अशी मृतांची नावे आहेत. नदीकाठावर महिला कपडे धूत होत्या. त्यावेळी मुले नदीत वाहून जात असल्याचे त्यांना दिसले. मुलांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली असता त्याही वाहून गेल्या.
रात्रगस्त घालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या आठच दिवसांपूर्वी सिध्दापूर (ता. मंगळवेढा) गावात आलेल्या नेपाळी कुटुंबातील दोन महिला आणि दोन लहान मुलांचा गुरूवारी दुपारी भीमा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सासू-सुनेसह दोन नातवंडाचा समावेश असल्यामुळे पोटासाठी आलेले गुरखे कुटुंब पोरके झाले आहे.
ही घटना गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास सिध्दापुरातील भीमा नदीपात्रात घडली. सायंकाळपर्यंत चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर सिध्दापूर गावावर शोककळा पसरली असून नेपाळी कुटुंबाचा आक्रोश पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
बालुदमाई कर्णसिंग सिंग (वय ३०), मनसरादमाई बसंतदमाई सिंग (वय ३०), नमुना कर्णसिंग सिंग (वय ११), हिरदेस बसंतदमाई सिंग (वय ८, सर्व रा. जुम्बुकॉच, ता. चामुंडा ब्रिदासैनी, जि. दैलेक, राज्य काठमांडू, प्रदेश कर्नाली, देश नेपाळ) अशी मृतांची नावे आहेत. गुरूवारी (ता. 13) दुपारी बाराच्या सुमारास बालुदमाई कर्णसिंग सिंग, मनसरादमाई बसंतदमाई सिंग ह्या दोघी सासू-सून धुणे धुण्यासाठी म्हणून सिध्दापुरातील भीमा नदीच्या पात्रात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत नमुना, हिरदेश व संदेश हेसुध्दा गेले होते. बालुदमाई आणि मनसरादमाई (सासू-सून) ह्या दोघी नदीपात्रातील पाण्यात धुणे धूत असताना नमुना, हिरदेश आणि संदेश हे तिघेही तिथेच पाण्यात पोहत होते. पोहता पोहता नमुना व हिरदेश हे पाण्यात बुडू लागले. ते पाहून त्यांना वाचवण्यासाठी बालुदमाई आणि मनसरादमाई ह्या दोघीसुध्दा पाण्यात गेल्या. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही पाण्यात बुडाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ संदेशने ठोकली घराकडे धूम
आपल्या घरातील चौघेही पाण्यात बुडाल्याचे पाहून त्यांच्यासोबतच असणारा संदेश हा लहान मुलगा घाबरून घराकडे पळाला. घरी कर्णसिंग धनसिंग सिंग (वय ५६) आणि त्याचा पुतण्या बसंतदमाई सिंग हे घरी होते. संदेशने नदीपात्रातील प्रसंग सांगितल्यानंतर कर्णसिंग व बसंतदमाई यांनी नदीकडे धाव घेतली. ते ओरडत नदीकडे पळत असल्याचे पाहून गावकरीसुध्दा त्यांच्या मागोमाग नदीपात्राकडे पळाले. सर्वजण पाण्यात उतरले तेव्हा बालुदमाई आणि मनसरादमाई यांचे मृतदेह सापडले.
○ नमुना व हिरदेशचे मृतदेह सापडले सायंकाळी
दरम्यान, नदीकाठी गर्दी झाली. तोपर्यंत ही माहिती पोलिसांनाही पोहचली. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा नदीकाठी आला. गावकऱ्यांच्या मदतीने दिवसभर मृतदेहाचा शोध सुरू होता. सायंकाळच्या सुमारास नमुना आणि हिरदेश यांचे मृतदेह सापडले. चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक पिंगळे पुढील तपास करीत आहेत.
○ चौथ्या दिवशी चौघांचा मृत्यू
कर्णसिंग धनसिंग सिंग (वय ५६) आणि त्याचा पुतण्या बसंतदमाई सिंग हे आठ दिवसांपूर्वी सिध्दापुरात आले होते. रात्रगस्त घालण्याचे काम ते करत होते. सिध्दापुरात राहण्यास घर मिळाल्यानंतर कर्णसिंगची पत्नी बालुदमाई, पुतण्याची पत्नी मनसरादमाई, मुलगी नमुना, नातू हिरदेश आणि संदेश हे तीन दिवसांपूर्वी सिध्दापुरात आले होते. त्यानंतर चौथ्याच दिवशी या कुटुंबातील चौघांना जलसमाधी मिळाली.