मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एक मंत्री असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याची वेळ आलीय, असे दिसते. त्यांचे सातत्याने वादग्रस्त बोलणे अतिच झाले. वा महाराष्ट्राने आणि भाजपाने त्यांना आतापर्यंत खूप सहन केले. आता नाही सहन होत. त्यांची विधाने विरोधकांना घाव घालणारे नसून भाजपा व विशेष करून फडणवीस यांना अडचणीत आणणारी ठरत आहेत. बोलायलाही काही मर्यादा असतात. आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळे सामाजिक भान ठेवून बोलायला हवे, इतके तारतम्य पाटलांसारख्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नेत्याकडे नसावे, ही पक्षाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. Put the reins…I can’t bear it anymore… (Editorial) Chandrakant Patil BJP Babri Masjid Amit Shah Political Blog
चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप पक्षश्रेष्ठी आणि पक्षातही नाराजी असणे स्वाभाविक आहे. त्यांच्या या वक्तव्यावर फडणवीस यांनी खुलासा केला असता तर पक्षावर मोठी नामुष्की ओढवली असती. फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत निरोप देवून पाटील यांना खुलासा करायला लावला. याप्रकरणी फडणवीस यांनीही अलिप्त राहून व मौन पाळून पाटील यांचे हे वैयक्तिक मत असून भाजपचे नाही,’ असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना करण्याची सूचना केलेली असावी.
चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपची अनेकदा पंचाईत झाली आहे. त्यावेळी फडणवीस यांनी सारवासारव केली किंवा त्याबाबत पाटील यांना सूचना केली. पण बाबरी मशीद शिवसेना कार्यकत्यांनी पाडली नाही किंवा तसा कट शिवसेना भवनात शिजला नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केल्याने शिंदेंसह त्यांच्या गटातील नेतेही चिडले. शिंदे यांनी आपली नाराजी भाजपा पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्याचे समजते. त्यामुळे फडणवीस यांच्याऐवजी थेट शिंदे यांनीच पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करायला लावला. भाजपाच्या एखाद्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले, तर प्रदेशाध्यक्ष किंवा फडणवीस यांच्याकडून त्याला स्पष्टीकरण करण्याची सूचना दिली जाते किंवा गरज असेल तेव्हा तंबीही दिली जाते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवेल व शिंदे गटाला ४० जागा मिळतील, असे वक्तव्य नुकतेच केले होते. तेव्हा फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याशी बोलून खुलासा करण्याची सूचना केली होती. पाटील यांच्या आताच्या वक्तव्यामध्ये मात्र फडणवीस अलिप्त राहिले किंवा ठेवले गेले. त्यांनी सारवासारवही केली नाही. मात्र पाटील यांचे वक्तव्य ही भाजपाची भूमिका नसल्याचा खुलासा बावनकुळे यांना करण्याची सूचना केली. भाजपाच्या माजी प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. आणि त्यांना खुलासा करण्याची सूचना सहकारी पक्षाचा प्रमुख करतो, अशी पाळी भाजपमध्ये क्वचितच आली आहे.
चंद्रकांत पाटील यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी निकटचे संबंध आहेत, असे नेहमी सांगितले जाते. मात्र त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसंदर्भातच वक्तव्य केल्याने पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांमध्येही नाराजी आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर खटके उडत असताना बावनकुळे आणि पाटील यांच्या वक्तव्यांमुळे त्यात भर पडली आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना भाजप व शिंदे गटात मतभेद वाढले, तर ते परवडणारे नसल्याने पक्षश्रेष्ठींनी थेट हस्तक्षेप केल्याचे सूत्रांनी सांगितले. पाटील हे ज्येष्ठ आहेत. भाजपाच्या यशात त्यांचे योगदान आहे म्हणून काय झाले? त्यांनी वाट्टेल ते बोलावे काय? -पक्षाची शिस्त पाहाता सरकारी निर्णयांवर आणि विरोधकांच्या भूमिकेवर एक प्रदेशाध्यक्ष किंवा फडणवीस यांनी बोलणे उचित ठरते. पाटील हे कोण लागून गेले? केवळ एक मंत्री बेताल बोलण्याने आपल्या तोंडावर शाई पडली, याचे भान पाटलांना राहू नये, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
उध्दव ठाकरे वा संजय राऊत यांच्यावर टीका केली असती तर मराठी माणूस करणे कितपत योग्य आहे. शिवसेनाप्रमुखांवर कुणीही टीका केली तर ती राज्याला सहन होत नाही. हे आता राज्यातील संताप पाहन भाजप श्रेष्ठींच्या लक्षात आलेले असावे. भाजपासारख्या केडर पार्टीत फक्त प्रदेश अध्यक्षांनी मत मांडावे, अशी शिस्त आहे पण आता उठसूठ कोणीही काहीही बोलत आहे. पाटलांच्या तोंडाला वेसण घालण्याची वेळ आलीय. त्यांचा राजीनामा घ्या किंवा तुम्हीतर द्या, असे आव्हान उध्दव ठाकरे यांनी दिले आहे पण आता पाटलांना मंत्रीमंडळातून हाकलून या अशी म्हणण्याची वेळ राज्यावर येवू नये, एवढी काळजी पक्षश्रेष्ठींनी आताच घ्यायला हवी.
✍️ ✍️ ✍️