सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीची अंतिम सुनावणी झालेली आहे. याचा निर्णय योग्य वेळी मीच घेणार आहे. डीजीसीए आणि महापालिका स्वतंत्र संस्था आहेत. ते मला आदेश देऊ शकत नाहीत. डिजीसीए ने महापालिकेला कोणत्याही प्रकारे काहीही कळवले नाही, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले. I will take the decision of DGCA and Municipal Corporation, an independent organization ‘Chimni’ at the right time: Commissioner Sheetal Teli Ugle Siddheshwar Sugar Factory
चिमणी प्रकरणावर मंगळवारी (ता. 11) सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका आयुक्त चिमणीचा निर्णय देऊ शकत नाही. डीजीसीएचा सर्वे पुन्हा एकदा होणार आहे. त्याचा अहवाल झाल्यावरच निर्णय होणार असल्याचे सांगितले होते. त्या संदर्भात महापालिका आयुक्तांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले म्हणाले की, डीजीसीए आणि महापालिका ही स्वतंत्र संस्था आहे. त्यांचा आणि महापालिकेचा काहीही संबंध नाही. ते मला कोणताही आदेश देऊ शकत नाही. चिमणीची अंतिम सुनावणी माझ्यासमोरच झाली आहे आणि त्याचा निर्णय मी योग्यवेळी देणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी जे सांगितले आहे. ते सर्वांना माहितीच आहे. त्यानुसार लवकरच निर्णय होईल असे सांगत महापालिका आयुक्तांनी नेमका चिमणीचा निर्णय कधी देणार हे मात्र स्पष्ट सांगितले नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी
○ उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्यचे अजित उंब्रजकर
सोलापूर : महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्यचे अजित उंब्रजकर यांची तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी तर खजिनदारपदी चंद्रकांत मिराखोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महापालिका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवारी पार पडली. यावेळी या निवडी करण्यात आल्या मावळते अध्यक्ष राकेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. इतर पदाधिकारी असे – उपाध्यक्ष – आफताब शेख, चिटणीस – विशाल भांगे,
रोहन श्रीराम, संदिप वाडेकर, कार्यकारणी सदस्य – आप्पासाहेब पाटील, सलमान पिरजादे, विकास कस्तुरे, अभिषेक अदेप्पा, यशवंत गुरव, बालाजी चिटमिल, प्रभू वारशेट्टी, अनिल कांबळे, आयुब कागदी सल्लागार प्रशांत जोशी, प्रशांत माने, समाधान वाघमोडे, सादिक इनामदार आदी.