¤ 17 पोलीस कर्मचारी निलंबित, सीएम योगींचे सर्व कार्यक्रम रद्द
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली. घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. Prayagraj Police suspends Yogi Sarkar after shooting dead notorious gangster Atiq Ahmed and his brother while chanting ‘Jai Shri Ram’
गोळी कोणी चालवली हे अद्याप समजू शकलेले नाही. तिघांनी त्यांच्यावर मेडिकल तपासणीसाठी घेऊन जाताना अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे तर अतिक आणि अशरफचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पणही केले आहे. यापूर्वी 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या झाली. अतिकचा मुलगा असद याच्या दफनविधीसाठी अतिकला जाता आले नाही त्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर ‘नहीं ले गए तो नहीं ले गए’, असे अतिक म्हणाला. त्यानंतर अतिकने ‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लीम…’ असे म्हणताच अतिकवर तीन हल्लेखोरांनी बंदुकीने गोळीबार केला. त्यात त्याचा व अशरफचा जागीच मृत्यू झाला.
उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#WATCH | UP: Police conducts flag march in Lucknow's Husainabad after the incident of Atiq Ahmed and his brother Ashraf shot dead pic.twitter.com/PkNQmS24Vi
— ANI (@ANI) April 15, 2023
अतिक अहमद हा प्रयागराज जिल्ह्यातील गुन्हेगार होता. तो सलग पाच वेळा अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग 5 वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आला होता. समाजवादी पक्षाकडून भारतीय संसद आणि उत्तर प्रदेश विधानसभेचा माजी सदस्य होता. त्यांची आज गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. अतिकवर 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. त्याला काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने ताब्यात घेतले होते.
अतिक अहमद आणि अशरफ यांची काल रात्री तिघांनी हत्या केली आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आहे आहे. दरम्यान, अतिकची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच योगी सरकारने 17 पोलिसांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माफिया अतिक अहमदच्या हत्येवर प्रतिक्रीया दिली आहे. ‘अतिक आणि त्याचा भाऊ पोलिस कस्टडीत होते. त्यांना हाथकड्या लावलेल्या होत्या. जय श्री रामचे नारेही लावण्यात आले. दोघांची हत्या होणे हे योगींच्या कायदा व्यवस्थेचे अपयश आहे. एन्काउंटर राजचा आनंद साजरा करणारेही या हत्येसाठी जबाबदार आहेत’, असे ओवैसी म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अतीक अहमद आणि अशरफच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
प्रयागराजच्या घटनेनंतर लखनऊ पोलीस हायअलर्टवर आहेत. पोलिसांनी जुन्या लखनऊच्या हुसैनाबादमध्ये लोकांशी संवाद साधून गर्दी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी गस्त आहे. तसेच परिसरात अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांवर प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. आसपासच्या जिल्ह्यांतून पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. हे हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी बनून आले होते अशी माहिती देण्यात येत आहे.
अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.