मुंबई : खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. Appasaheb Dharmadhikari constituted a one-member committee to investigate the facts of the Kharghar tragedy महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल, अशी माहिती शिंदे यांनी ट्विटरवर दिली आहे. दरम्यान, विरोधकांनी या घटनेची न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असणार आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत या दुर्घटनेबाबतचा अहवाल सादर करणार आहे.
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आलेल्या 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.
मुख्यमंत्री कार्यालयाने याच निवेदनात पुढे म्हले आहे की, ही समिती महिनाभरात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. कडक उन्हाळ्यात आणि पुरेशा व्यवस्थेशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राज्य सरकारवर तीव्र टीका होत असताना समितीची स्थापना करण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या मृत्यूसाठी राज्य सरकारविरुद्ध दोषी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे. त्यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सोहळ्यातील विविध घटना व घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्व बाबींची शहानिशा करून त्यामधील सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे तसेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, ‘ महाराष्ट्र राज्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार यंदा जाणीवपूर्वक आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला परंतु पुरस्कार प्रदान करताना उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला हे अत्यंत निंदनीय आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आम्ही आठवण करून देत आहे की, ज्यावेळेस ज्येष्ठ मराठी अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून सांगितले होते की आपल्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी आपली निवड केली आहे.
त्यावेळेस अभिनेते निळू फुले मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मी या पुरस्कारासाठी पात्र होण्यास कोणत्याही पराक्रम केला नाही.. उलट पोटापाण्याची सोय म्हणून मी अभिनय करतो आणि माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही.. उलट अशा माणसाला पुरस्कार द्यावा जो समाजासाठी काम करतो याची आठवण ठेवून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या १४ श्रीसदस्यांचे मृत्यू सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. तसेच प्रसार माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त बघता हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने असा प्रश्न निर्माण होतो. यावर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्य सरकारला जनाची नाही, तर मनाची लाज असती तर त्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले असते, पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे. मात्र, या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी काँग्रेस पक्ष २४ एप्रिल रोजी राज्यभरात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगेन, असंही पटोले यांनी पत्रात सांगितलं आहे.
○ उष्माघात की चेंगराचेंगरी ?
या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
● राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच कार्यक्रमाची वेळ दिली होती असे सांगून सरकार आता त्यांनाच दोषी ठरवत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते. त्यामुळे १४ मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं.