नाशिक : नाशिकच्या सटाण्यातील एका शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. Dead Nashik Satana is shown as a living farmer who is a former sarpanch on PM Kisan portal
शेतकऱ्याला मृत घोषित केल्याने त्याच अनुदान गोठले आहे. रमेश केदा बच्छाव असे या शेतकऱ्याचे नाव असून ते लखमापूर गावचे माजी सरपंच आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे PM किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करुनही अनुदान मिळत नसल्याने चौकशी केली असता सदर बाब समोर आली आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे पीएम किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करुनही अनुदान मिळत नसल्यामुळं संबंधित विभागाकडे चौकशी केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानं रमेश बच्छाव यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करुन संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी रमेश बच्छाव यांनी केली आहे. जिवंत शेतकरी PM किसानच्या पोर्टलवर मृत दाखवल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक आहे. शेतकरी पर्यायामध्ये, आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधा. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक अजून लिंक केला नसेल, तर तुम्ही तसे करू शकता. गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ काही ठिकाणी सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील घ्यायला सुरुवात केल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर अनेकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या. शासनाची फसवणूक करुन लाटलेले पैसे परत करा अन्यथा गुन्हे दाखल करु असा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 महाराष्ट्रातील सर्व शाळांना आजपासून सुट्टी
महाराष्ट्रातील सर्व शाळांना आजपासून (21 एप्रिल) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उन्हामुळे मुलांना शाळेत जाण्यास अडचणी येत असल्याने पालकांनी यासंबंधीचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आजच यासंबंधी मोठा निर्णय घेणार, असे जाहीर केले. त्यानुसार अखेर शिंदे सरकारने सुट्ट्यांबाबतचा आदेश जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांना आजपासून (21 एप्रिल) उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उन्हामुळे मुलांना शाळेत जाण्यास अडचणी येत असल्याने पालकांनी यासंबंधीचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत निर्णय घेत सुट्टीची घोषणा केली. दरम्यान शाळा 15 जूनपासून उर्वरित महाराष्ट्र आणि 30 जून विदर्भातील शाळा सुरू होतील असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.