मुंबई : अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील मतभेद काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहेत. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, कोण संजय राऊत ? असे उत्तर त्यांनी दिले. Ajit Pawar said, who is Sanjay Raut? ‘Ajit Pawar will come out of Mahavikas Aghadi only because of Raut तसेच मी प्रत्येक प्रवक्त्याने आपापल्या पक्षावर बोलावे, हे म्हणताना कुणाचे नाव घेतले नव्हते, मग कुणाच्या अंगाला का लागावं, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार हे संजय राऊत यांना कंटाळूनच मविआतून बाहेर पडतील असे वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. “राऊत यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार अजित पवारांना मविआतून बाहेर काढतील. राऊत यांची थोरवी मोठी आहे. शिवसेनेचे 40 आमदार त्यांना कंटाळून गेले. शिवसेना फोडण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे. महाविकास आघाडी फुटण्यातही राऊत यांचा मोठा वाटा असेल.” असे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कोण संजय राऊत? असा पत्रकारांना प्रश्न केला होता. त्यामुळे यांच्यात काहीतरी बिघडले आहे, अशी चर्चा सुरु होती. यावर आता संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले. पवार व आमच्यात कोणताही वाद नाही. दोन दिवसांपूर्वीच आम्ही सोबत जेवण केले. अजित पवार हे फार गोड आहेत. ते स्वतःच एक स्वीट डिश आहेत. भाजपामधील लोक भांडण लावत असतील, असे राऊत म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले, संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढतील. शिवसेनेतील 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले. अजितदादा पवार हे सुद्धा संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील. महाविकास आघाडी फुटण्यास संजय राऊतच जबाबदार राहतील. तशी त्यांची थोरवी मोठी आहे. शिवसेना फोडण्यातही त्यांचाच मोठा वाटा आहे. राऊतांनीच 40 आमदारांना घराच्या बाहेर काढलं, असं विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सामन्यातील रोखठोकवरून संजय राऊत विरुद्ध अजित पवार कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता भाजप खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना अजित पवार मविआत नको आहेत. शरद पवारांच्या सांगण्यावरून संजय राऊत अजित पवारांना मविआच्या बाहेर काढतील. शिवसेनेचे 40 आमदार फुटले आता मविआतून अजित पवार संजय राऊतांमुळे बाहेर पडतील असा घणाघात अनिल बोंडेंनी केला.
घाटकोपर येथे एनसीपी कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संबोधित करणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत अजित पवार यांचं नाव नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अजित पवार पुण्यात असल्याने त्यांचं नाव कार्यक्रमाच्या यादीत नसल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यक्रमातून मला साईडलाईन करण्यात आल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. माझे कार्यक्रम पूर्वनियोजित होते. संध्याकाळी पुण्यात माझी मुलाखत आहे. तीही पूर्वनियोजित होती. त्यामुळे मी घाटकोपर येथे होणाऱ्या अधिवेशनाला जाऊ शकणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.