मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी पुढील दीड वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत, असे विधान केले. Sushma Andhare claims that Eknath Shinde was instructed to prepare his resignation, the news was published
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचं वृत्त गुजरातमधील वृत्तपत्रात छापलं असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, गुजरातमधील वृत्तपत्रात बातमी येते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली हेडक्वॉर्टरमधून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना आल्या आहेत. याचाच अर्थ असा की भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते असं दिसत आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.
या दाव्यानंतर आता शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर उदय सामंत यांनी, “दीड वर्ष एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपा आणि शिवसेनेच्या निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. तसेच, पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असतील,” अशी आशा उदय सामंत यांनी व्यक्त करत सुषमा अंधारे त्यांच्या टीका केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
‘सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद झाला, तर ८० टक्के कटुता संपेल’, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्यावर प्रश्न विचारला असता, उदय सामंत यांनी म्हटलं, “ही फक्त देवेंद्र फडणवीस नाहीतर महाराष्ट्राची मागणी आहे. यात काहीही वावगं नाही. संजय राऊत त्यांच्यात आणि आमच्यातच कटुता वाढवत आहेतच. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही ते कटुता वाढवण्याचं काम करत असल्याचा आरोपही केला.
● खारघर दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समितीची स्थापना
मुंबई : खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल, अशी माहिती शिंदे यांनी ट्विटरवर दिली आहे. दरम्यान, विरोधकांनी या घटनेची न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असणार आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत या दुर्घटनेबाबतचा अहवाल सादर करणार आहे.
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आलेल्या 14 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.