○ शिक्षण विभाग झाला खडबडून जागा
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून वारंवार अत्याचार होत असल्याचे पत्र माहिला आयोगास प्राप्त झाल्यानंतर महिला आयोगाने याबाबत चौकशी करून कारवाई करण्या बाबत आदेश मोहोळ पोलिसांना दिले. A minor girl was molested by a teacher, the Women’s Commission’s order to investigate the incident in Solapur is mohol त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु केली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी आहे की एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पाच ते सहा शिक्षक काम करतात. या शाळेची विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या ही मोठी आहे. अशा शाळेत एका शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना केली. शाळेतील शिक्षक अल्पवयीन असलेल्या शाळेतील विद्यार्थीनीना शिकवण्याच्या नावाखाली शाळा सुटल्यानंतर थांबून घ्यायचा आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा हा प्रकार नियमितपणे सुरू होता, अशीही चर्चा मोहोळ तालुक्यात सुरू आहे.
या घटनेची शहानिशा करण्यासाठी हा शिक्षक मुलींना घेऊन काय शिकवतो हे पाहण्याची त्याची इच्छा झाली. त्याने त्या वर्ग खोलीची हुबेहुब डूप्लीकेट चावी बनवून आत शाळेच्या खोलीमध्ये कॅमेरा बसवले होते, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. परंतु याबाबत ठोसपणे कोणीही बोलत नाही, कोणाचे नाव घेत नाही व मागील पाच दिवसापासून मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची याबाबत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत खरे नेमके काय झाले हे समजू शकत नाही.
दरम्यान याबाबत महाराष्ट्र राज्य जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैया देशमुख यांनी मोहोळ पोलिसांना लेखी निवेदन दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तरीही मोहोळ पोलीस त्या गावात जावून कानोसा घेत होते. परंतु कारवाई होत नव्हती कुणीच ठामपणे बोलत नव्हते पण चर्चा तर होत होती.
याबाबत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गावातील एका सुजान नागरिकाने याबाबत महिला आयोगाकडे पत्राव्दारे तक्रार केली. महिला आयोगाने या पत्राची गंभीरपणे दखल घेत तात्काळ मोहोळ पोलिसांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोहोळ पोलिसांनी याबाबत गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांना याबाबत अहवाल मागितला असून शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.
गट शिक्षण अधिकारी मल्लिनाथ स्वामी यांनी शाळेत जावून शिक्षकांचे जबाब घेतले आहेत. शाळेतील मुख्याध्यापक वैद्यकीय रजेवर तर संबंधीत शिक्षकही रजेवर गेला आहे. त्यामुळे त्यांना चार शिक्षकांचे जबाब मिळाले आहेत. याबाबतचा अहवाल गट विकास अधिकारी यांच्यामार्फत मोहोळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे गट शिक्षण अधिकारी मल्लीनाथ स्वामी यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मसालापानामध्ये गुंगीचे औषध देऊन केले तरुणीवर दुष्कर्म, व्हिडिओ पाठविण्याच्या धमकीने पैशांची मागणी
सोलापूर – तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून घरी बोलावून पानातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दुष्कर्म केले. तिचे काढलेले नग्न फोटो व व्हिडिओ नातेवाइकांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल तरुणावर खंडणी व दुष्कर्मचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत १९ वर्षाच्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन शुभम गौतम शिंगे याच्यावर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२२ मध्ये शुभम याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून आपल्या घरी बोलाविले. तिला खाण्यास दिलेल्या मसालापानामध्ये गुंगीकारक औषध देऊन तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतरही तीन महिने दुष्कर्म केले. या दरम्यान त्याने नग्न अवस्थेतील काढलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा चारवेळा दुष्कर्म केले. तसेच फोटो व व्हिडिओ नातेवाइकांना व्हॉट्सअॅपवर प्रसारित करेन अशी धमकी देऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.
परंतु फिर्यादी व नातेवाइकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फोटो व व्हिडिओ क्लिप नातेवाइकांमध्ये प्रसारित करुन पीडितेची बदनामी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाबळे हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी शुभम यास अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले. असता त्यास २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.