○ आषाढी यात्रेची शासकीय महापूजा रोखू
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. Solapur. Maratha society aggressive, sloganeering against the government, burning of the symbolic effigy of the government to prevent Pandharpur Ashadhi Government Mahapuja ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे. आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
’50 खोके एकदम ओके’ अशाही घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. पंढपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने हे आंदोलन केलं. सरकारने मराठा समाजाच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच लवकरच लवकर समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. अन्यथा येणारी आषाढी यात्रेची शासकीय महापूजा रोखू असा इशाराही दिला. पंढरपुरातील शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करु देणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी पंढरपुरात मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी (ता. 22) दहन करून शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला आहे. पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी सकाळी 11 वाजता मराठा समाज व मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून घोषणाबाजी केली.
या संदर्भात मराठा समाज राज्य समन्वयक राम गायकवाड म्हणाले की, मागील सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासाठी आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत आरक्षण न दिल्यास राजकीय संन्यास घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आम्हाला जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला. जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण देणार नाही तोवर आषाढी यात्रेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री यांना करू देणार नाही, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या वेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे, स्वागत कदम, धनाजी मोरे, आकाष पवार, नीलेश गंगथडे, अॅड. राजेश भादुले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नुकताच राज्य सरकारला मोठा धक्का दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची मागणी अमान्य करत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्याचं दिसून येत आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतरही एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजालाआश्वासन दिलंय. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, पुन्हा एकदा याचिका दाखल करायची वेळ आली, तर पुन्हा याचिका दाखल करू, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. “पुनर्विचार याचिका मान्य होण्याची शक्यता कमी असते. पण भोसले समितीने ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यावर राज्य सरकार काम करत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण मिळावं, म्हणून समितीकडून आलेल्या सूचनांची पूर्तता सरकारतर्फे केली जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.