सोलापूर : भरदिवसा शहरातील उद्योजकाच्या घरात घुसून त्याला रिव्हॉल्वर दाखवल्याची घटना बुधवारी दुपारी इंद्रधनु अपार्टमेंट मध्ये घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधीत तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर ती बंदूक नकली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तरूणावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. A young man entered the apartment in Mariai Chowk with a gun, demanded money, the gun turned out to be fake Solapur
इंद्रधनु अपार्टमेंट येथे विक्रम बंडेवार हे उद्योजक राहतात. ते बुधवारी (ता. 26) घरी असताना त्यांच्या घरी एक तरुण आला. त्याने थेट बंदुक काढून विक्रम यांच्याकडे रोखत पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळी घालतो अशी धमकी दिली. यावेळी घरातील सदस्यांनी समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्याच धावपळीत विक्रम यांच्या मुलीने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती कळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वपोनि उदयसिंग पाटील हे आपल्या पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच त्या तरुणाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यास आणले. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाकडून जप्त केलेली बंदूक ही नकली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, याबाबत संबंधित तरूणावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
○ अक्कलकोट परिसरात दोन कारची समोरासमोर धडक
सोलापूर : अक्कलकोट ते गाणगापूरकडे कारमधून जात असताना अक्कलकोटच्या सात किलोमीटर परिसरात दुसऱ्या कारची धडक बसल्याने पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (ता.27) दुपारी घडली.
यात माहतंप्पा बसवणप्पा मसूती (वय-५५, रा. अक्कलकोट), लक्ष्मण सुक्रीव शिंदे (वय-१९, रा.परभणी), मिलिंद विठ्ठल बनकर (वय-४३, रा.विक्रोळी मुंबई), रोनक मिलिंद बनकर (वय-११, रा.मुंबई), आदिनाथ जानकीराम लवटे (वय-१८, रा.आनंदवाडी, परभणी) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गुरूवारी दुपारी अक्कलकोट परिसरात दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनातील पाच जण जखमी झाले. अपघातानंतर त्यांना लगेच उपचारासाठी १०८ ॲम्ब्यूलन्सने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यात मसूती यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे, तर शिंदे याच्या डोळ्याला,मिलिंद यांच्या मानेला व आदिनाथ यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
○ टेंभुर्णी बस स्थानकात चोरीचा प्रयत्न; दोन महिलांना अटक
सोलापूर – टेंभुर्णी येथील बस स्थानकात बसमध्ये प्रवेश करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून १३ हजाराची रक्कम चोरताना सोलापुरातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
पूजा प्रकाश जोशी (वय ४२) आणि फातिमा सलीम शेख (वय ४४ दोघी रा. होम मैदान सोलापूर) अशी महिला चोरांची नावे आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुवर्णा उमाकांत वाघमारे (रा.बारलोणी ता.माढा) या आपल्या नातेवाईकांसह टेंभुर्णी बस स्थानकात अकलूज येथे जाणाऱ्या बस मध्ये प्रवेश करीत होत्या. त्यावेळी जोशी आणि शेख या दोघी महिलां त्यांच्या पर्समधील १३ हजार रुपये रोख असलेली पाकीट पळवली. त्यावेळी नातेवाईकांना संशय आल्याने दोघींनी पैसे असलेले पाकीट खाली टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना पकडून टेंभुर्णी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दोघीवर गुन्हा दाखल केला .हवालदार ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.