○ तब्बल 40 गुन्हे दाखल, ब्रिजभूषण सिंग राजीनाम्यास तयार
नवी दिल्ली : खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे गेल्या आठवड्याभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. या प्रकरणात कुस्तीपटूंना दिग्गज आजी-माजी खेळाडूंचा पाठिंबा मिळत आहे. तसेच कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. MP Brijbhushan Singh was finally booked, but the agitation continued till he went to jail Jantar-Mantar Innocent Reaction
भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र कुस्तीपटूंनी त्यांचे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत ब्रिजभूषण जेलमध्ये जात नाहीत, तोपर्यंत आम्ही दिल्लीत आंदोलन सुरुच ठेवणार, असे कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटले आहे. तसेच ब्रिजभूषण यांना पदावरून हटवा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टात कुस्तीपटूंची बाजू मांडताना त्यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 40 गुन्हे दाखल असल्याचे पुरावे सादर केलेत. सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन केले आहे. तर आज ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास दिल्ली पोलिसांनी होकार दिला आहे.
भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्तीगीर परिषेदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची चर्चा आहे. जर आपल्या राजीनाम्यावर आंदोलक कुस्तीपटूंचे समाधान झाल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. तर बृजभूषण यांचा राजीनामा नको, तर त्यांना अटक झाली पाहिजे, या भूमिकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.
#WATCH | I am innocent and ready to face the investigation. I am ready to cooperate with the investigative agency. I have full faith in the judiciary and I respect the order of Supreme Court: WFI chief & BJP MP Brij Bhushan Sharan Singh on FIRs registered against him following… pic.twitter.com/0cbtlQWB0m
— ANI (@ANI) April 29, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे. त्याने, “ज्यांनी देशाचे नाव मोठे केले, झेंडा फडकवला, आपल्याला आनंद दिला आहे. त्यांना रस्त्यावर यावे लागले. ही संवेदनशील घटना असून याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, आशा आहे खेळाडूंना न्याय मिळेल,” असे म्हटले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. ‘जर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची परिस्थिती अशी असेल तर सामान्य माणूस लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज कसा उचलणार, स्वतःला राष्ट्रवादी सरकार म्हणणाऱ्या या सत्ताधाऱ्यांमधील एकही नेता कुस्तीपटूंशी चर्चा का करत नाही ? असे स्वराने ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कारवाईची मागणी कुस्तीपटूंनी केली.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय मिळेल का? असा सवाल करत माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट दिसून येत आहेत. तर विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत या प्रकरणी न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत.
मी निर्दोष आहे आणि तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. मी तपास यंत्रणेला पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो असे WFI प्रमुख आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
ब्रिजभूषण सिंह यांनी आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण म्हणाले की, एफआयआर दाखल करण्याबाबत चर्चा झाली आहे. एफआयआरची प्रत सध्या माझ्याकडे नाही. पण एफआयआर झालीच असेल तर मला त्यात काही गैर दिसत नाही. माझा दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी या आरोपांना सामोरे जाण्यास तयार आहे.