मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाची केंद्रातील धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवावी तर राज्याची धुरा अजित पवारांकडे सोपवावी, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निवृत्तीचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. त्या बैठकीला अजित पवार व सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असे भुजबळ म्हणाले. ‘Ajitdada in Maharashtra, Supriyatai in the Centre’, the decision of the presidency on May 5! Supriya Sule Ajit Pawar Sharad Pawar
सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया 15 दिवसांपासून सुरू आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे न घेतल्यास सुप्रिया सुळेच अध्यक्ष होणार असल्याचे समोर आले आहे. वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीची बैठक झाल्याची माहिती आहे. बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत, अशी घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकीय मॅच पूर्णतः फिरल्याचे मत राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. भारतीय जनता पक्षासोबत जाऊ इच्छिणाऱ्या, वेगळा विचार करू पाहणाऱ्या पक्षातील गटाची पुरती कोंडी पवार यांनी केल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांच्या निर्देशानुसार ती 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे रोजी मिळणार आहे. राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल असं म्हटलं जातंय.
राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आज शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना व माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे. त्यांनी 5 मे रोजी बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल, तो आपल्याला मान्य असेल असेही पवार यावेळी म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शरद पवार म्हणाले की, मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मे रोजीच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
शरद पवार पुढे म्हणाले की, 1 मे 1960 रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं 1 मे सोबत माझं वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.
○ आतापर्यंत कुणी कुणी दिले राजीनामे ?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली, अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, नवे प्रदेशाध्यक्षही नेमणार का?, जिल्हा स्तरावरील समीकरणं कशी बदलणार? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडले होते. निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार , याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
– राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड
– राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील
– पनवेल शहर अध्यक्ष सतीश पाटील
– बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाजीर काझ
– धाराशिवचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार
– अनेक पदाधिकाऱ्यांचा राजीनामा.