सोलापूर – दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलेले प्रमोद केशव जाधव (वय ४० रा. हिप्परगा ता.लोहारा) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मयत झाले. हा अपघात मंगळवारी (ता. २) दुपारच्या सुमारास घडला. Two-wheeler head-on collision at Lohara: One killed, uncle-nephew child sex act offence
प्रमोद जाधव हे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या घराकडून लोहारा येथे दुचाकीवरून निघाले होते . शिवकरवाडी येथ समोरून दुसरी दुचाकी धडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना लोहारा येथे प्राथमिक उपचार करून पांडुरंग पाटील (सासरे) यांनी सोलापुरात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले . या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
● उळेवाडी येथे एसटीच्या धडकेने पादचारी वृद्ध ठार
सोलापूर – तुळजापूर मार्गावरील उळेवाडी येथे एसटीच्या धडकेने रस्ता ओलांडणारे पादचारी वृद्ध गंभीर जखमी होऊन मरण पावले . हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.
अशोक पांडुरंग खोपडे (वय ६५ रा. मंगरूळ ता.तुळजापूर) असे मयताचे नाव आहे. ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास पत्नीसोबत तुळजापूरहून उळेवाडी येथे सुनेला भेटण्यासाठी आले होते. रस्ता ओलांडत असताना तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने येणारी (एमएच २०-बीएल-४२१५) क्रमांकाची एसटी धडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली असून फौजदार लोकरे पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ काकाचा पुतणीवर अत्याचार; काकाविरुद्ध बाललैंगिक छळ कायद्यान्वये गुन्हा
सोलापूर : आपल्या काकाकडे आश्रयाला गेलेल्या पुतणीवर काकाने अत्याचार केल्याचा प्रकार शहरात घडला असून याप्रकरणी पीडितेने 112 नंबर डायल वरून तक्रार दिल्याने काकाला अटक करण्यात आली आहे.
पीडितेच्या वडिलांना दिसत नसल्याने आईने दुसर्या व्यक्तीशी लग्न केले. त्यामुळे पीडितेच्या पालनपोषणाची जबाबदारी आजी-आजोबांकडे आली. एक वर्षापूर्वी काकाने आजी – आजोबांकडून मी पुतणीला सांभाळतो म्हणून तिला आपल्या कुटुंबामध्ये आणले. 28 एप्रिलच्या रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपले. पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी काकाने पीडितेचे तोंड दाबून उचलून दुसर्या खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार तिच्या वडिलांना व आजी – आजोबांना सांगितला; पण काहीच सूचेनासे झाल्याने तिने कोठे वाच्यता केली नाही. पीडितेने धाडस दाखवून पोलिसांच्या 112 नंबर फोन करून भांडणाबद्दल व स्वत:वर काकाने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानुसार काकाविरुद्ध बाललैंगिक छळ कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.