सोलापूर – धावत्या रेल्वे खाली एका २४ वर्षीय अविवाहीत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना आसरा पुलाजवळील कल्याण नगर जवळ येथे आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. Educated youth commits suicide under train near Asra Bridge, Solapur
धीरज प्रभू कांबळे (वय २४ रा.मंगल रेसिडेन्सी,डीमार्टच्या पाठीमागे) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह कल्याणनगर येथे रेल्वे खाली सापडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात आई-वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे.
काल गुरुवारी रात्री तो घरातून न सांगता गेला होता. खिशात सापडलेल्या मोबाईल वरून त्याची ओळख पटली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. हवालदार बहीर्जे पुढील तपास करीत आहेत .
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 उळे येथे ट्रक अडवून हल्ला ; मध्यप्रदेशचे दोघे जखमी; चौघावर दरोड्याचा गुन्हा
सोलापूर – बटाटे वाहतुकीचा ट्रक अडवून दोघांना तीक्ष्ण शस्त्र आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत १० हजार रुपये लुटण्याची घटना तुळजापूर मार्गावरील उळे (ता.उत्तर सोलापूर) येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी चौघा अनोळखी इसमाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे .
जितेंद्र शोभाराम सिंह (वय ३१) आणि समीर रफिक खान (वय ३२ दोघे रा.भिंड, मध्यप्रदेश) अशी जखमीची नावे आहेत. त्यापैकी समीर शेख याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघे ग्वाल्हेर येथून ट्रक मध्ये बटाटे भरून तुळजापूर मार्गे दावणगिरी (कर्नाटक) येथे निघाले होते.
उळे येथील राजधानी धाब्याजवळ जेवण करून रात्री १० वाजेच्या सुमारास ते पुढच्या प्रवासासाठी निघाले होते. वाटेत जॅक पडल्याने ट्रक उभा करून ते खाली उतरले होते. त्यावेळी चौघा अनोळखी दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील १० हजार रुपये घेऊन पसार झाले. या घटनेची फिर्याद जितेंद्र सिंह यांनी पोलिसात दाखल केली . पुढील तपास फौजदार निंबाळकर करीत आहेत.