○ कर्नाटकात काँग्रेस अलर्ट… हैदराबादचे रिसॉर्ट बुक ?
वृत्तसंस्था : काँग्रेसने कर्नाटकात आता मोठी आघाडी घेतली आहे. एकूण 120 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप 69 आणि जेडीएस 26 आणि अपक्ष 5 जागांवर पुढे आहेत. Bet reversed: Congress alliance close to majority, Chief Minister will change Karnataka election त्यामुळे आता काँग्रेस बहुमताजवळ पोहोचली आहे. हे सध्या कल आहेत. यामध्ये मोठा बदल होण्याचा विश्वास अजूनही भाजपचे नेते व्यक्त करत आहेत.
कर्नाटकात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार कॉंग्रेस बहुमताजवळ पोहोचली आहे. त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री बदलणार, काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सध्या विधानसभेच्या मतमोजणीत काँग्रेस 120 जागांवर पुढे आहे. तर भाजप 69 आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहेत.
कर्नाटक विधानसभेत बहुमताच्या दिशेने जात असलेल्या काँग्रेसचे दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनी विजय मिळवला आहे. ते कनकपुरा येथून विजयी झाले आहेत. शिवकुमार यांनी अशोक यांचा पराभव केला आहे. डी. के. शिवकुमार यांचा हा सलग आठवा विधानसभा निवडणुकीतील विजय आहे. दरम्यान काँग्रेस सध्या 118 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 73 जागांवर पुढे आहे.
सकाळी कर्नाटकमध्ये काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजप 80 जागांवर पुढे होता . कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी 200 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये जेडीएसला 15 जागांवर आघाडी आहे. तर काही ठिकाणी अपक्ष पुढे आहेत. दरम्यान एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात सत्तांतर होणार आणि काँग्रेसला बहुमत मिळणार, असा दावा करण्यात आला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळाली याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत काँग्रेसला 42.93 टक्के, भाजपला 36.17 टक्के आणि जेडीएसला 12.97 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस सध्या 117 जागांवर पुढे आहे. भाजप 75 जागांवर पुढे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#WATCH | "No one has contacted me till now. There is no demand for me, I am a small party" says JD(S) leader HD Kumaraswamy, ahead of Karnataka election results. pic.twitter.com/0Mkbqdd7Tr
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकात काँग्रेस बहुमताजवळ पोहोचली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसला 118 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसचे 118 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस सर्व विजय आमदारांना एकत्र ठेवणार आहे. त्यासाठी हैदराबादमध्ये काँग्रेसने रिसॉर्ट बुक केल्याची माहिती समोर आली आहे. तर विशेष हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची आघाडी वाढत आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी तब्बल 109 जागांवर आघाडी घेत काँग्रेस बहुमताजवळ पोहोचली आहे. मात्र हे सुरुवातीचे कल आहे. यामध्ये मोठा बदल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजप सध्या 96 जागांवर पुढे आहे. तर जेडीएसला मात्र फक्त 16 जागांवर आघाडी घेण्यात यश आले आहे. बेळगावमध्ये भाजप आघाडीवर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई विजय झाले आहेत.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अचानक बाजी पलटली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने तब्बल 122 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप पिछाडीवर पडले आहे. भाजप सध्या 84 जागांवर पुढे आहे. दरम्यान हे सुरुवातीचे कल आहेत. यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. जेडीएसला मात्र कर्नाटकात 12 जागांवरच आघाडी मिळाली आहे.
काँग्रेस आणि भाजपने कर्नाटकात हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस सर्व विजयी आमदारांना बंगळुरुमध्ये एकत्र ठेवणार आहे. तर भाजपने जेडीएससोबत चर्चा सुरु केली आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार कर्नाटकात काँग्रेस 117 जागांवर पुढे असून भाजपला 70 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर जेडीएस 29 जागांवर पुढे आहे. त्यामुळे आपल्याला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळावी, यासाठी काँग्रेस आणि भाजप प्रयत्न करत आहे.