● अडचणी वाढल्या त्या कर्नाटकातच दिला भाजपला धक्का
नवी दिल्ली : दक्षिण भारतातील एकमेव कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता होती. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 65 जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपची येथील सत्ता गेली आहे. कर्नाटकात आता काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाचे नेते चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. तर आंध्र प्रदेशात वाएसआर पक्षाचे जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडूत डीएमके आणि केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. BJP out of South Indian states; Congress won 136 seats after 36 years Rahul Gandhi Mallikarjun Kharge Bharat Jodo Yatra Narendra Modi
दक्षिणेतलं मोठं आणि एकमेव राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान मोदींनी स्वतः इथं २० हून अधिक जाहीर सभा घेतल्या, रोड शो केले. बजरंग बली, द केरला स्टोरी हे मुद्दे जाणीवपूर्णक भाजपनं प्रचारात आणले. पण याचा काहीही उपयोग झाला नाही आणि भाजपला मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं. कर्नाटकच्या कानडी जनतेने भाजपला सपशेल नाकारले आहे. तर काँग्रेसला पुर्ण बहुमतात सरकार बनवण्याची संधी दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कर्नाटकातील 224 विधानसभा मतदार संघांपैकी 51 मतदारसंघ कव्हर केले होते आणि यांपैकी 32 जागांवर काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. अशा प्रकारे काँग्रेसला 63 टक्के जागांवर राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा झाला आहे. कन्याकुमारी पासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती आणि 3 महिन्यातं जवळपास, 4000 किलोमीटर एवझी यात्रा करून ते काश्मीरात पोहोचले होते. यांपैकी 21 दिवस, म्हणजेच 30 एप्रिल ते 19 ऑक्टोबरपर्यंत राहुल गांधी यांनी कर्नाटकात यात्रा केली. यादरम्यान ते रोज जवळपास 25 किलोमिटर पर्यंत यात्रा करत होते.
भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदी कर्नाटक निवडणुकीत सर्वाधिक सक्रिय राहिले. 29 एप्रिल ते 7 या दरम्यानच्या काळात मोदींनी सात दिवस प्रचार केला. पंतप्रधानांनी राज्यातील 31 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये रॅली आणि रोड शो केले. मोदींनी या काळात 18 रॅली आणि सहा रोड शो केले. मोदींनी रोड शोद्वारे विधानसभेच्या 28 मतदारसंघ पिंजून काढले. म्हैसूर येथील प्रसिद्ध श्रीकांतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. गृहमंत्री अमित शहा यांनी 16 रॅली तर 20 रोड शो केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षासाठी पूर्ण ताकद लावली. शाह यांनी 21 एप्रिल ते 7 मे असे नऊ दिवस कर्नाटक राज्यात प्रचार केला. त्यांनी 31 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये रॅली आणि रोड शो केले. ज्यामध्ये 16 रॅली आणि 20 रोड शो यांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केले. ‘अहंकार जास्त काळ टिकत नसतो. हि लोकशाही आहे. लोकशाहीत आपल्याला लोकांसमोर झुकावे लागते. त्यांचे ऐकावे लागते. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. हा कोणा एकाचा विजय नाही. राज्यातील जनतेचा हा विजय आहे. 36 वर्षांनंतर आपल्याला 136 जागा मिळाल्या आहेत’, असे खरगे म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत. जाहीरनाम्यात नमुद जनहिताच्या सर्व योजना आम्ही लागू करु, असे आश्वासन खरगेंनी दिले. राहुल गांधी, प्रियांका गांधी व सोनिया गांधी यांचे खरगेंनी आभार मानले आहेत. ‘आम्ही जिंकलो, आता आम्हाला काम करायचे आहे. मला कोणावरही टीका करायची नाही. लोकांनी आमच्यावर दर्शवलेला विश्वास आम्ही खरा ठरवू’, असे खरगे म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे 2019 मध्ये भाषण केले होते. भाषणातून त्यांनी मोदी आडनावावर टीका केली होती. त्यानंतर त्याच भाषणामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. तसेच त्यांना न्यायालयाने 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राहुल यांनी कोलार येथूनच प्रचाराला सुरुवात केली होती. त्याच कर्नाटकात आता राहुल यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. लोकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोदींनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कर्नाटक निवडणुकांमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीची मी प्रशंसा करतो. येत्या काळात आपण कर्नाटकची जोमाने सेवा करु’, असे ट्विट PM मोदींनी केले आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे.
कर्नाटकात बहुमताच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसपुढे मुख्यमंत्रीपदावरून मोठी अडचण झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ सिध्दरामय्यांच्या गळ्यात पडते का डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. निवडणुकीआधी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. सिध्दरामय्यांनी 2013 ते 2018 पर्यंत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. तर शिवकुमारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार पाहिला.
कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी आज संध्याकाळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यासंदर्भात भाजप नेते बोम्मई यांनी सांगितले की, मी राज्यपालांकडे वेळ मागितला आणि राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी खूप प्रयत्न करूनही निवडणुकीत आपली छाप सोडता आली नाही. काँग्रेस छाप पाडण्यात यशस्वी ठरली असही ते म्हणाले आहेत. आम्ही हा निकाल सकारात्मकपणे घेऊ आणि पक्षाची पुनर्रचना करू, जेणेकरून लोकसभा निवडणुकीत आम्हाला पुनरागमन करता येईल असा विश्वासही बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.
》 भाजपच्या जोल्लेंनी केला राष्ट्रवादीचा पराभव
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकातील निपाणी येथे जाहीर सभा घेतली होती. निपाणी मतदारसंघातून भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील पराभूत झाले आहेत. जोल्ले या सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात साडे तीन जिल्ह्यांपूरता आहे, त्याला पार्सल करुन महाराष्ट्रात पाठवून द्या अशी टीका फडणवीसांनी निपाणीतील सभेत केली होती.