》 अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील पदांचा समावेश
》 340 पदासाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च
सोलापूर : अनेक वर्षांनंतर सोलापूर महापालिकेत मेगा भरती करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील 340 पदांचा समावेश आहे. 340 पदासाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च होणार आहे. तीन महिन्यांत प्रत्यक्षात भरतीसाठी अर्ज, परीक्षा आदी प्रक्रिया पार पाडली जाईल. सुमारे 60 हजार इच्छुक उमेदवार यात सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. After many years, mega recruitment will be done in Solapur Municipal Corporation
सोलापूर महापालिकेकडील आकृतीबंधनुसार एकूण 4612 इतकी मंजूर असून त्यापैकी 1172 पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांपैकी सरळसेवेने भरती करावयाची 1001 इतकी पदे रिक्त आहेत. यामध्ये विविध एकाकी पदे तसेच कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता सहाय्यक, अग्निशामक, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते वर्ग 4 मधील पदांचा समावेश आहे. प्रशासकीय कामकाज सुरळीत व प्रभावीपणे राबविण्याकरीता तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने ही 340 पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया शासन आदेशानुसार टीसीएस या कंपनीच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तयारी सुरू केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ 340 पदासाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च !
सोलापूर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील एकूण 340 पदे भरण्यात येणार आहेत. या 340 कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी एकूण 15 कोटी 15 लाख 44 हजार 856 रुपये अधिक खर्च होणार आहे. 2.05 टक्के वेतन खर्च वाढणार आहे. सध्या सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च 41.33 टक्के आहे. तो वाढून 43.38 टक्के होणार आहे.
□ या पदांची होणार भरती, कंसात संख्या अशी :
पर्यावरण संवर्धन अधिकारी (1) , मुख्य अग्निशामक अधिकारी/अधिक्षक अग्निशामक दल (1), पशु शल्य चिकीत्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी(1), उद्यान अधिक्षक(1), क्रीडाधिकारी(1), जीवशास्त्रज्ञ(1), महिला व बालविकास अधिकारी(1), समाज विकास अधिकारी(1), कनिष्ठ अभियंता -आकिटेक्चर (1), कनिष्ठ अभियंता – आटोमोबाईल (1), कनिष्ठ अभियंता – विदयुत (5), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (73), कनिष्ठ अभियंता- यांत्रिकी(2), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी (1), जनसंपर्क अधिकारी(1), नेटवर्क इंजिनिअर (1), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ(1), फायर मोटार मेकॅनिक(1), सहाय्यक उद्यान अधिक्षक (1), केमिस्ट (2), लॅबटेक्निशियन(2), कनिष्ठ अभियंता सहाय्यक – स्थापत्य( 30) , आरोग्य निरीक्षक (15), स्टेनो टायपिस्ट (3), फिल्टर इन्पेक्टर (3), अनुरेखक – ट्रेसर (2), कनिष्ठ श्रेणी लिपीक (70), मिडवाईफ (50), पाईप फिटर व फिल्टर फिटर (10), पंप ऑपरेटर (20), फायरमन (35), सुरक्षारक्षक (5) अशी एकूण 340 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.