पुणे : जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर आवारे यांची शुक्रवारी हत्या करण्यात आली. त्यांच्या आईने पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी कट रचून माझ्या मुलाची हत्या करायला लावल्याचा आरोप, त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तळेगाव दाभाडे येथे आवारे कामानिमित्त आले असता त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार करत हत्या केली. A case has been registered against MLA Sunil Shelke and five persons in Talegaon Pune murder case
तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात मावळचे राष्ट्रवादीचे आ. सुनिल शेळके यांचे नांव पुढे आले असून या प्रकरणी आमदार शेळके व त्यांचा भाऊ सुधाकर शेळके विरोधात काल रात्री उशीरा पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे यांनी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून किशोर आवारे यांची राजकीय विरोधक असलेले आ. सुनिल शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे व कार्यकर्त्यामध्ये नेहमीच भांडणे होत. गेल्या सहा महिन्यापासून किशोर हे आपल्या जिवाला आ. शेळके यांच्याकडून धोका असल्याच सांगत होते असं फिर्यादीत म्हंटलयं. आ. शेळके त्यांचे भाऊ या शिवाय पाच विरोधात गुन्हा नोंद झालायं.
आमदार सुनील शेळके म्हणाले, काल दुपारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची नगरपालिकेच्या आवारामध्ये दुपारी हत्या करण्यात आली. या हत्येचा, घटनेचा जाहीर तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. कालची घटना झाली त्या घटनेनंतर आज सकाळी सात वाजता सुनील शेळके नॉट रीचेबल, फोन स्विच ऑफ अशा पद्धतीने माध्यमाने ज्या काही बातम्या लावण्याचे काम केलं त्या अनुषंगाने आत्ता मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहे.
कालची जी काही घटना झाली या घटनेमध्ये कोण आरोपी आहेत. ही घटना का केली, यामागची सत्यता काय आहे, त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? ते कोण गुन्हेगार आहेत याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी प्रामाणिकपणे करण्याचं काम करत आहेत. जी काही घटना घडली या मावळ तालुक्याला वेगळा पायंडा पाडण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमातून कुणी करू नये. याच करता आम्ही सातत्याने देखील समंजसपणाची भूमिका घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परंतु ही फिर्याद देत असताना शेवटी एखाद्या कुटुंबातला व्यक्ती गेल्यावरती त्या परिवाराची भावना देखील तीव्र असते, हे आम्ही समजू शकतो. परंतु त्या मागचे खरे सूत्रधार कोण आहेत. कोण हे सगळं घडवत आहे कोण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतो हे देखील आम्ही पुढील काळामध्ये शोध घेऊन तो नक्कीच जनतेपुढे आणल्याशिवाय राहणार नाही.
मला एवढे सांगायचे की माझ्या मायबाप जनतेने या सुनील शेळकेला आयत्या वेळेला पक्षांमध्ये दुसऱ्या येऊन सुद्धा 94 हजार मताने निवडून दिले. ते कुणाच्या जीवावर उठायला, कुणाला लुटमार करायला, कुणाला फसवायला निवडून दिले नाही. राजकारण करत असताना आपण विकासाचा राजकारण केले पाहिजे. आपण आरोप प्रत्यारोप करत असतो तरी ते तात्पुरते असले पाहिजेत.
सामाजिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये काम केलं. माझ्या राजकीय जीवनात कधी साधी कोणाच्या तोंडात थप्पड मारली किंवा कुणाला शिवी दिली असा कुठेही गुन्हा नाही. अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देईल. मी कायद्याने चालणारा माणूस आहे. मला खाकी वर्दीचे संरक्षण आहे. मी अशा फडतूस गुन्हेगारांकडे का लक्ष देऊ. कुणीही कुणाच्या जीवावर उठेल पण सुनील शेळके अशा घाणेरड्या प्रवृत्तीकडे कधीच जाणार नाही. या घटनेची माहिती मी स्वतः उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे, असेही आमदार शेळके म्हणाले.
१५ वर्षाच्या कामाची फक्त १५ मिनिटात बदनामी होत असल्याने माध्यमांनी खात्री करून बातम्या द्यावात, असे ते कळकळीने म्हणाले. तपासात अडथळा न आणण्याचे तसेच शक्तीप्रदर्शन न करण्यासही त्यांनी आपल्या समर्थकांना यावेळी बजावले. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजच व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही यासंदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.