● 2047 पर्यंत भारत महासत्ता बनेल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दिक्षांत समारंभाला उपस्थिती दर्शवली. भारत 2047 पर्यंत महासत्ता बनेल तसेच सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. Maharashtra bows before Delhi: Chief Minister Eknath Shinde falls at the feet of BJP leaders Defense Minister Rajnath Singh India’s superpower देशात आज रायफलपासून ते ब्रह्मोस मिसाईलपर्यंत व लढाऊ विमानांपासून ते स्वदेशी जहाजांपर्यंत सर्व काही तयार केले जात आहे. आत्मनिर्भरतेमुळे हे शक्य झाले, असे सिंह म्हणाले.
पुण्यात Defence Institute of Advanced Technology चा 12 वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजनाथ सिंह यांच्या पाया पडले. यावरून विरोधकांनी शिंदेंना लक्ष्य केले. तसेच महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला असे म्हटले.
छत्रपती संभाजी नगरमध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
#WATCH | We have now released the fourth positive indigenisation list of 928 strategically important components for DPSUs taking the total number of components to 4,666. These components will now be sourced locally: Defence Minister Rajnath Singh, in Pune pic.twitter.com/LxFTmLUMZw
— ANI (@ANI) May 15, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पुण्यामध्ये संरक्षणविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान संस्थेच्या 12 व्या दीक्षांत समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची राजनाथ सिंह यांनी यावेळी माहिती दिली. निव्वळ आयातदार होण्याऐवजी निव्वळ निर्यातदार होण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे केवळ आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
संरक्षण क्षेत्र म्हणजे एका जागी स्थिर असलेला तलाव नसून एक वाहती नदी आहे. ज्या प्रकारे एखादी नदी आपल्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओलांडत पुढे जात राहते त्या प्रकारे आपल्याला सुद्धा सर्व अडथळे पार करून पुढे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण संशोधन आणि अतिशय अचूकता असलेले तंत्रज्ञान यांच्यातील जवळचा संबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी डीआयएटीसारख्या संस्थांना केवळ संरक्षण क्षेत्रासाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांना देखील तितक्याच प्रमाणात फायदेशीर असलेले नवीन नवोन्मेषी संशोधन हाती घेण्याचे आवाहन केले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मागील काही दिवसांपुर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली आहे.