कोल्हापूर : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. सांगलीतील मिरजेजवळ बायपासवर जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. या अपघातात सहा जण ठार झाले आहे. कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडेचे सर्व मृत आहेत. त्यामुळे सरवडे गावावर शोककळा पसरली आहे. Horrible accident while coming to Pandharpur, five killed Radhanagari Kolhapur Miraj Sangli
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण जीपमधून सोलापूरकडे जात होते. त्यांची जीप मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने विटांनी भरलेले ट्रॅक्टर येत होते. त्यावेळी त्यांची जीप आणि टॅक्टर यांची समोरासमोर घडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो थेट ट्रॅक्टरमध्ये घुसली.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर मिरजपासून सुरु होणार टप्पा मंगळवार १६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग अपघात झाला.
बोलेरोतील जयवंत दत्तात्रय पोवार (५४) व त्यांची पत्नी स्नेहल पोवार (84) मुलगा (१२, सर्व रा. सरवडे), तर जयवंत पोवार यांच्या सासूबाई कोमल श्रीकांत शिंदे (६३, रा. इचलकरंजी), तर कोमल शिंदे यांचे मेहुणे लक्ष्मण शंकर शिंदे (७०, मूळगाव बानगे (सध्या रा. सुरत), ड्रायव्हर परप्रांतीय उमेश उदय शर्मा (३०, मूळ गाव उत्तर प्रदेश, सध्या रा. शेळवाडी) अशी ठार झालेल्या सहाजणांची नावे आहेत.
अपघातात 3 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर आज (बुधवार) सकाळी मिरज जवळील वड्डी गावाजवळील महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठ ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीमधील सर्वजण कोल्हापूरहुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते. पण त्याचवेळी विरुद्ध बाजूने विटाने भरलेला ट्रॅक्टरला आला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली बोलेरो गाडी ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. बोलेरो गाडी ट्रॅक्टरमध्ये अडकून पडली होती. घटनास्थळी जेव्हा मदत पोहोचली तेव्हा मृतदेह अक्षरश: पत्रा कापून बाहेर काढावे लागले होते.
बोलेरो गाडीतील मृत्युमुखी पडलेले कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहचल्यानंतर अपघात झाला. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मिरज पोलिस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.