Saturday, June 10, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांचे स्वप्न भंगले

Siddaramaiah the new Chief Minister of Karnataka, D. K. Shivkumar's dream shattered Deputy Chief Minister election politics

Surajya Digital by Surajya Digital
May 18, 2023
in Hot News, देश - विदेश, राजकारण
0
सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांचे स्वप्न भंगले
0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : कर्नाटकात बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली.  Siddaramaiah the new Chief Minister of Karnataka, D. K. Shivkumar’s dream shattered Deputy Chief Minister election politics त्यांनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री व डीके शिवकुमारांना उपमुख्यमंत्री बनवणार असल्याचे सांगितले. या निर्णयानंतर सरकार स्थापनेसाठी सर्वांचे एकमत झाले. त्यांचा 20 मे रोजी बंगळुरूत शपथविधी होणार आहे.

 

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री न झाल्याने त्यांचे भाऊ खासदार डी. के. सुरेश यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मी पूर्ण आनंदी नाही, पण कर्नाटकच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध असून हा निर्णय स्वीकार करत आहोत, भविष्यात आणखी संधी आहेत, अजून खूप मोठा रस्ता आहे, शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत, असे मला वाटत होते,’ असे सुरेश यांनी सांगितले. दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे.

 

डी. के. शिवकुमार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे. सिद्धरामय्या यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याची औपचारिक घोषणा काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी आज केली आहे. तसेच डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदावरही कायम राहणार आहेत. बंगळुरुमध्ये शनिवारी 20 मे रोजी दुपारी त्यांचा शपथविधी होणार आहे.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त केल्याबद्दल डीके शिवकुमार यांना आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हायकमांडचा निर्णय स्वीकारला आहे. त्यामुळे मी नाराज नाही. मी नाराज का व्हावे? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे,’ असे ते म्हणाले. तर सिद्धरामय्या यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

#WATCH | Siddaramaiah will be the Chief Minister of Karnataka and DK Shivakumar will be the only deputy CM, announces KC Venugopal, Congress General Secretary -Organisation. pic.twitter.com/q7PinKYWpG

— ANI (@ANI) May 18, 2023

 

सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला.

सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.

सिद्धरमय्या यांचा जन्म 3 ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते. आई बोरम्मा गृहिणी होती. दहा वर्षांपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. बीएसस्सी आणि एलएलबी त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून केली. पाच भाऊ-बहिणींमध्ये सिद्धरमय्या हे दुसऱ्या क्रमांकाचे. ते कुरुबा गौडा समाजाचे आहेत. सिद्धरमय्या म्हैसूरचे वकील चिक्काबोरय्याचे ज्युनिअर होते. काही दिवस त्यांनी कायद्याचे शिक्षण दिले.

 

सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण ५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यापैकी २१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. तसेच दोघांच्या नावावर ३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यापैकी सिद्धरामय्या यांच्याकडे ९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे २० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्या कुटुंबावर २३ कोटी रुपयांचं कर्जदेखील आहे.

 

● कर्नाटकातील 97 टक्के आमदार करोडपती

 

कर्नाटकात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात जिंकलेले तब्बल 217 आमदार करोडपती आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या रिपोर्टनुसार 97 टक्के आमदारांजवळ कोट्यवधींची संपत्ती आहे. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार 1413 कोटींसह सर्वात श्रीमंत आमदार आहेत. तर भाजपच्या भागिरथी मुरुल्याजवळ सर्वात कमी 28 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर 122 आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

Tags: #Siddaramaiah #new #ChiefMinister #Karnataka #DKShivkumar #dream #shattered #DeputyChiefMinister #election #politics#सिद्धरामय्या #कर्नाटक #नवे #मुख्यमंत्री #डीकेशिवकुमार #स्वप्न #भंगले #निवडणूक #राजकारण #उपमुख्यमंत्री
Previous Post

पंढरपूरला येत असताना भीषण अपघात, सहा जण ठार

Next Post

आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि प सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि प सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले

आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि प सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले

वार्ता संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697