पंढरपूर : सोशल मीडियावर मी आत्महत्या करण्यास जात असून माझा शोध घेऊ नका अशा प्रकारची पोस्ट टाकून गेले दोन दिवस बेपत्ता असणारे भोसे जि प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे करकंब पोलीसांना सापडल्याची माहिती करकंब पोलीस स्टेशन चे स पो नि निलेश तारू यांनी दिली. Former district member Balasaheb Mali, who disappeared due to suicide, was finally found by Pandharpur Karakamba Police
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोसे जी प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी हे त्यांचे पेट्रोल पंपावरील मॅनेजर तानाजी कोळी याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्यास जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस स्टेशन येथे दिली होती.
जि. प. सदस्य व दत्तकृपा पेट्रोलपंपाचे मालक बाळासाहेब माळी दि. 15 रोजी रात्री 9 च्या सुमारास बेपत्ता झाले होते. यावेळी त्यांनी माझा शोध घेऊ नका असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांचा साथीदार बंडू भुईरकर यांच्यासह बेपत्ता झाले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अखेर बुधवारी (दि.17) दुपारी 11 च्या सुमारास भुईरकर यांनी त्यांच्या मोबाईल वरून सज्जन भोसले, पंढरेवाडी यांना गोंदवले येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी बाळासाहेब माळी यांचे चुलत बंधू रामदास माळी यांना सोबत घेऊन तात्काळ गोंदवले गाठले. करकंब पोलिसांची मोबाईल लोकेशन तपासणी सुरू असल्याने त्यांना ही गोंदवले लोकेशन आढळून आले. त्यामुळे करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि यांचे पथकही तेथे पोहचले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणी करून बाळासाहेब माळी व बंडू बुईरकर यांना रात्री 8 च्या सुमारास करकंब पोलिसांत घेऊन आले.
सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शना खाली स पो नि निलेश तारू यांनी एक पथक तयार करून श्री माळी यांचे तपासासाठी पाठविले सदर पथकाने मोबाईल सी डी आर व गोपनीय बातमीदार यांचे सहकार्याने गतीने तपास करून सातारा जिल्हातील गोदवलेकर महाराज मठासमोर माळी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि निलेश तारू करीत आहेत.