समाज जीवनामध्ये किंवा राजकारणात एखाद्याला उच्च पद मिळाले की, त्याला थोडी हवेची नशा चढते ? तो तसा हवेतच वावरतो. त्यात राजकारण म्हटलं तर विचारूच नका. Nana Patole became… ‘High Kamad’! Get a little air-sick? Congress politics अशा नेत्याला समोरचा लहान आहे की मोठा आहे, त्याचा राजकारणातील अनुभव कसा आहे, किती वर्षे तो राजकारणात आहे, आजवर कुठली पदे भूषविली, कुणाबद्दल काय बोलावे अणि काय बोलू नये याचे कुठलेच भान राहता नाही.
आपल्याला मानाचे पद दिले असले तरी सर्वाधिकार दिले नाहीत. वरही कुणातरी आपला ‘बापमाणूस’ बसला आहे. त्यामुळे अशा नेत्यांने मोजूनमापून आणि बेतानेच बोलले पाहिजे. पण हवेत असणाऱ्या काही नेत्याची गाडी नेहमीच ‘सुसाट’ असते. अशीच एकंदर स्थिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या बाबतीत होताना दिसत आहे.
त्यांची देहबोली, वागणे, बोलणे अगदी त्याच दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. हे काँग्रेसमधील अनेक जुन्या-जाणत्यांना रुचत नाही. त्यामुळे काँग्रेसमधील जुन्या नेत्यासोबत त्यांचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ‘शितयुध्द’ सुरु आहे. मध्यतंरी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर पटोले यांच्याशी अबोलाच केला होता. हे प्रकरण थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकंमाडपर्यंत गेले. तेथे नाना पटोले यांनी सपशेल ‘हात’ टेकल्याचे बोलले जात आहे. असाच प्रकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या अधून-मधून होताना दिसून येत आहे.
आजही नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश काँग्रेसच्या ज्या ज्या बैठका होतात, त्यात शाब्दिक चकमकी होतातच. याचाच अर्थ नरमाईची व सामंजस्याची भूमिका घेऊन पक्षावर ‘कंमाड’ निर्माण करण्यात नाना पटोले हे कमी पडतात, हेच स्पष्ट होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रविवारी सोलापुरात काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले भाषण करताना ‘सुसाट’ झाले. त्यांनी नेहमीप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकार यांच्यावर टिकेचे बाण सोडून कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले. आणि याच वेळी ‘सोलापूर लोकसभा तर हक्काचा…. नाही कुणाच्या ‘बापाचा’ असा नारा देत आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघावर ‘डोळा’ रोखला.
सोलापूर लोकसभा सुशीलकुमार शिंदेंचा आहे. ते आता निवडुकीला ना… ना… करीत असले तर ते हवे आहेत, असे सांगून सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची सोलापूर लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे घोषणाच करुन टाकली. यात कहर म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच आमदार निवडून आले पाहिजेत, या सर्व मतदारसंघावरही ‘तिरछी नजर’ टाकली. आणि हे ११ आमदार काँग्रेसचे झाले तर आ. प्रणिती शिंदे यांना मी मंत्री करतो, अशी डरकाळीची फोडली.
खरंतर काँग्रेस पक्षात स्थापनेपासूनच ‘हायकंमाड’ला अनन्य साधारण महत्व आहे. लोकसभा काय विधानसभेचे तिकीट काय राज्यातील मंत्रीपदे काय हे सार काही, दिल्लीश्वरांच्या हाती आहे. हे काँग्रेसमधील साध्या कार्यकर्त्याला माहिती आहे. आणि प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना आपल्या ‘हायकंमाड’ बद्दल माहिती नसावे?. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी आणि आ. प्रणिती शिंदे यांचे मंत्रीपद याबाबत नाना पटोले यांनी वाश्चता करुन दिल्लीतील काँग्रेसच्या ‘हायकंमाड’ ची सूत्रे हाती घेतली काय ? असेच अनेकांना वाटत आहे. मेळाव्यानंतर काँग्रेसच्या जुन्या-जाणत्यामध्ये याबाबत ‘… यांच्या हातात काय, सगळं काय ‘हायकंमाड’ ठरवतयं, अशीच कुजबुज मात्र ऐकावयास मिळाली, त्यामुळेच हा ‘नाना’ बद्दल लेखन प्रपंच.
नजिकच्या काळात पटोले यांनी असेच ‘ना… ना…’ उद्योग केले तर त्यांच्या पदाला ‘दे धक्का’ बसल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र निश्चित.
• शंकर जाधव
दैनिक सुराज्य, कार्यकारी संपादक मो.९५१८३०७७४८