Saturday, June 10, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मोहोळ । रात्री ढाब्यावर झाले कामगारांमध्ये भांडण; संशयावरून केला खून

Mohol At night there was a fight between the workers at the dhaba; Murder on suspicion

Surajya Digital by Surajya Digital
May 23, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापूर । सुनेने केला सासूचा गळा आवळून खून, कारण वाचाल तर व्हाल थक्क
0
SHARES
142
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मोहोळ : पोखरापूर (ता. मोहोळ) येथे आकाश ढाब्यावर काम करणाऱ्या कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केला ही घटना सोमवारी सकाळी घडली. Mohol At night there was a fight between the workers at the dhaba; Murder on suspicion Pokharapur police stone

 

मोहोळ पंढरपूर रोडवर पोखरापूर जवळ आकाश हॉटेल नावाचा ढाबा आहे. हॉटेलचे मालक धनाजी वामन गायकवाड हे दररोज रात्री १२ वाजता बंद करतात. बाहेर गावचे कामगार त्याच ठिकाणी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या रूममध्ये राहण्यास आहेत.

 

पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे मालक गायकवाड यांना हॉटेलमधील वस्ताद बाल मुकुंद चौधरी यांनी फोन करून सांगितले की मालिक संदीपने संजू मुहपर बडा पत्थर डाला है और उसका दोस्त सत्येंद्र वर्मा के साथ वो भाग गया हैं, संजू के मुह से बहुत खून बह रहा है असे सांगितले आणि मालकांनी तातडीने आपल्या मित्राला सोबत घेऊन हॉटेल गाठट ले आणि जाऊन पाहिले असता धर्मेंद्र उर्फ संजीव यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या तोंडातून नाकातून कानातून रक्त येत होते व त्याचे डोक्याच्या बाजूलाच रक्त लागलेला मोठा दगड पडला होता. त्यावेळी वस्ताद बाल मुकुंद चौधरी यास संदीपने संजय यादव को किंवा मारा असे विचारले असता त्यांनी सांगितले की संजू हा संदीपच्या वहिनीच्या बहिणीला चोरून फोन करत होता.

 

 

या कारणावरून त्यांचेच रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास वादावादी झाली होती त्यांचे भांडण लागले होते. त्यानंतर त्यांचे भांडण सोडवून सर्व जण झोपी गेले होते. सकाळी सहा वाजता त्यांना जाग आली तेव्हा पाहिले असता संदीप यादव हा मोठा दगड घेऊन संजय यादव याचे अंगावर दगड उचलून टाकत असताना त्याने पाहिले आणि लगेच त्याला धक्का दिला. त्यावेळी तो दगड खाली पडला त्याच वेळी सत्येंद्र वर्मा हा पण जागा झाला संदीप यादव आणि वर्मा सोबत घेऊन पळून गेला.

रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून संदीप यादव याने धर्मेद्र उर्फ संजीव यादव यांच्या तोंडावर सकाळी ६ वाजता मोठा दगड मारून जीवे ठार मारले असे वस्ताद बाल मुकुंद चौधरी यांनी मालकांना हिंदीमध्ये सांगितले. मालक गायकवाड यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत माहिती देऊन कायदेशीर फिर्याद दिली. धर्मेंद्र उर्फ संजीव राजीव यादव यास जीवे ठार मारणारा संदीप रामनरेश यादव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 लॉजवर बीअर पाजून मुलीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

 

सोलापूर : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बिअर पाजून एका तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचारावेळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून २ लाख रुपये घेतल्याप्रकरणी ओंकार बाळासाहेब मोरे (वय २३, रा. सोलापूर) याच्यावर बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडितेशी आरोपीची मागच्या वर्षी ओळख झाली होती. त्या ओळखून आरोपीने पीडितेसोबत प्रेमाचे नाटक करत तिला नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथम लॉजवर नेत तिला बीअर पाजून ती शुद्धीत नसताना तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळीचे तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत माझे कर्ज फेडण्यासाठी पैसे दे म्हणत धमकी दिली. तसेच पीडितेने पैसे दिल्यानंतरही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेने आपल्या आजीचे एटीएम कार्ड व पासवर्ड ही आरोपी ओंकार मोरे याला दिले.

 

 

आरोपी हा त्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून घेत होता. थोड्या दिवसांनी पीडितेने याबाबतची माहिती कुटुंबियांस कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, आरोपीने पीडितेकडून २ लाख रुपये घेत अत्याचारातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली आहे.

Tags: #Mohol #night #fight #between #workers #hotel #dhaba #Murder #suspicion #Pokharapur #police #stone#मोहोळ #पोखरापूर #रात्री #ढाबा #कामगार #भांडण #संशय #दगड #खून
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये होणार घमासान

Next Post

नाना बनले… ‘हायकंमाड’ ! थोडी हवेची नशा चढते ?

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नाना बनले… ‘हायकंमाड’ ! थोडी हवेची नशा चढते ?

नाना बनले... 'हायकंमाड' ! थोडी हवेची नशा चढते ?

वार्ता संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697