Saturday, June 10, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये होणार घमासान

In Solapur district, the Mahavikas Aghadi will have a fight, Karnataka captures the Congressman, and many factions are in the air in politics.

Surajya Digital by Surajya Digital
May 23, 2023
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये होणार घमासान
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ कर्नाटक काबीज केल्याने कॉंग्रेसजन हवेत…
सोलापूर : कर्नाटकातील दणदणीत विजयामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून आता कॉंग्रेसने सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. रविवारी झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेतही दिले आहेत. In Solapur district, the Mahavikas Aghadi will have a fight, Karnataka captures the Congressman, and many factions are in the air in politics.

 

सोलापूर लोकसभेसह माढा लोकसभा ही जिंका आणि जिल्ह्यातील अकरा विधानसभेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. आता या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता दुसरे घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात महाविकास आघाडीमध्ये चांगलेचे घमासान होणार असून कॉंग्रेसजन मात्र सध्या हवेत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर दौर्‍यावर आले असता त्यादरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे सोडवून घ्यावा, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी पवारांनी जरी हा विषय टाळला असला तरी मुंबईमध्ये सोलापुरातील प्रमुख पदाधिकार्‍यांना बोलावून लोकसभेची सविस्तर माहिती घेतली होती.

 

राष्ट्रवादी वारंवार सोलापूर लोकसभेवर दावा करत आहे, तिकडे सुशीलकुमार शिंदे हेही लोकसभा लढवणार नाही असे म्हणत होते. त्यामुळे  कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान कर्नाटक मधील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कॉंग्रेसला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले. यामुळे संपूर्ण देशात कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. जो तो स्वबळाची भाषा करत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

नुकत्याच सोलापुरात झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. सोलापूर लोकसभा तर जिंकाच, याउलट माढा लोकसभाही जिंका आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अकरा विधानसभेवरही कॉंग्रेसचा झेंडा फडकवा, आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे असे सांगत एक प्रकारे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला आव्हानच दिले आहे.

 

वास्तविक पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद मोठी आहे.  अपवाद वगळता हा लोकसभा मतदारसंघ कायम कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. मात्र दुसरीकडे माढा मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद अगदी नगण्य आहे, असे असतानाही नाना पटोले यांनी माढा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. हा दावा म्हणजे राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रकार आहे, असे बोलले जात आहे.

 

राष्ट्रवादी सोलापूर लोकसभा मतदारसंघ मागत आहे. त्यामुळेच जाणून-बुजून नाना पटोले यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

महाआघाडीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाना पटोले यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महाआघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी म्हणजेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटांनी एकत्र लोकसभेसह विधानसभा निवडणुका लढाव्यात असे ठरले होते. मात्र नाना पटोले यांनी स्वबळाचे संकेत दिल्यामुळे आता याकडे राष्ट्रवादी आणि ठाकरे गट कशा पद्धतीने पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: #Solapur #district #MahavikasAghadi #fight #Karnataka #captures #Congressman #many #factions #air #politics.#सोलापूर  #जिल्हा #महाविकासआघाडी #घमासान #कर्नाटक #काबीज #काँग्रेसजन #हवेत #नानापटोले
Previous Post

हिप्परगा तलावात बुडून अंत, मृत्यू दिसताच दोघे मित्र एकमेकांना कवटाळले

Next Post

मोहोळ । रात्री ढाब्यावर झाले कामगारांमध्ये भांडण; संशयावरून केला खून

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । सुनेने केला सासूचा गळा आवळून खून, कारण वाचाल तर व्हाल थक्क

मोहोळ । रात्री ढाब्यावर झाले कामगारांमध्ये भांडण; संशयावरून केला खून

वार्ता संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697