मोहोळ : मोहोळ पंढरपूर रोडवर पाटकुल गावचे शिवारात दुचाकी स्वराला भरधाव वेगात निघालेल्या कारने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३ मे ) सायंकाळी ०६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. Solapur. A policeman died in a bike and car accident
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी दत्तु माळी (रा. शेटफळ ता. मोहोळ) हे नातेवाईकांना भेटण्यासाठी पाटकुल येथे आले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी ६ः४५ वाजण्याच्या सुमारास एम.एच. १२, एच. पी. ५१२५ या दुचाकी वरून माळी हे पाटकुल येथून शेटफळकडे जात असताना मोहोळ ते पंढरपुर हायवे रोडवर बिभिशन माने यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एम. एच. १२, जे झेड ३०४१ ने जोराची धडक दिली.
यात धनाजी माळी यांना गंभीर मार लागला. अपघातानंतर धनाजी माळी यांचे पेनूर येथील नातेवाईक उत्तम डोके हे मोहोळकडे येत असताना त्यांनी अपघातग्रस्त धनाजी माळी यांना ओळखले. त्यांना तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले, असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
अपघातानंतर कारचालकाने कार तशीच पुढे नेऊन मगरवाडी पाटी जवळ उभी करून पळून गेला. धनाजी माळी हे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ पुणे येथे कार्यरत होते. याप्रकरणी उत्तम डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालकावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास अपघात पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार ज्योतिबा पवार करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पोलीस निरीक्षकांसह 300 पोलिसांच्या अंतर्गत बदल्या
सोलापूर : सीआयडीच्या चौकशीच्या कचाट्यात अडकलेले पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह तीन पोलिस निरीक्षक व ३०० पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले.
सोलापूर शहर पोलिस दलातील आस्थापना मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस अंमलदाराच्या विविध शाखा व पोलिस ठाणे येथील रिक्त पदे व त्यांनी दिलेले पसंतीक्रम (विनंती बदली) विचारात घेऊन शिवाय कार्यकाल पूर्ण नसलेले; परंतु प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली असल्याचे सांगण्यात आले.
या बदली प्रक्रियेत अनेकांना एक वर्षाची मुदतवाढही देण्यात आली आहे. याशिवाय परिवीक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक अजय पोपटभट व राधा जेऊघाले यांना प्रशिक्षणासाठी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १०, सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.