Saturday, June 10, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चार जणावर गुन्हा दाखल

Husband's suicide due to wife's immoral relationship; A case has been filed against four people including his wife, boyfriend Solapur Mohol

Surajya Digital by Surajya Digital
May 26, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
न्यायालयीन खटला मागे घेण्यासाठी मागितली खंडणी, कुटुंबाची बदनाम करण्याची धमकी, बार्शीत पाचजणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ : पत्नीचे असलेले अनैतिक संबंध सांगून सुद्धा ती सोडण्यास तयार नसल्यामुळे अखेरीस तिच्या या वर्तनाला कंटाळून पतीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना औंढी (ता. मोहोळ ) येथे घडली आहे. यामुळे पत्नी, तिचा प्रियकर, सासू आणि अन्य एक अशा ४ जणाविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौदा वर्षापूर्वीच लग्न झाले होते. Husband’s suicide due to wife’s immoral relationship; A case has been filed against four people including his wife, boyfriend Solapur Mohol

 

याबाबत मयत मुलाचे वडील हिदूराव सिताराम भुसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. मोहोळ पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार नेताजी हिंदुराव भुसे (वय ३७, रा. औंढी, ता. मोहोळ) यांची पत्नी शुभांगी यांचे भावकीतील पांडुरंग भुसे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचे नेताजींच्या लक्षात आले होते.

 

याविषयी नेताजीने ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना सांगितले आणि त्यांनी आपल्या सुनेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुरुवातीला ही गोष्ट ऐकली मात्र काही दिवसानंतर परत त्यांचे अनैतिक चाळे सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा शुभांगीचा पती आणि संबंधित पांडुरंग भुसे व भावकीतील काही माणसे त्यांना बोलावून पुन्हा एकदा या दोघांना हे संबंध बंद करण्यासाठी तंबी दिली. तुमचा सुखाचा संसार असून दोन सोन्यासारखी मुले आहेत. त्यांच्याकडे बघून झालेले विसरून जावा आणि संबंध बंद करा असे त्यांना सांगितल्यावर काहीच फरक पडला नाही.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

दोघांनी ऐकले नाही. पुन्हा त्यांचे चोरून संबंध सुरू झाल्याचे मृत नेताजी यांच्या लक्षात आले. यामुळे वैतागलेल्या नेताजीनी आपल्या आई-वडिलांना याविषयी माहिती दिली आणि माझ्या जीवनात काही अर्थ राहिला नाही, असे सांगितले. त्यानंतर मंगळवारी (ता. 23 मे ) सकाळी सहाच्या दरम्यान नेताजी हा शेतामध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. हे लक्षात येतात मयताचे वडील आणि काही नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तो उपचारा पूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर मृत नेताजीचा अंत्यविधी सुरू असताना त्याचा मुलगा म्हणजे फिर्यादीचा नातू श्रेयश याने आपल्या आईकडे बघून तुझ्यामुळेच माझा पप्पा देवा घरी गेला आहे, तू इथून निघून जा असे रडत रडत सांगितले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा विधी झाल्यानंतर नेताजीचा मुलगा आजोबांकडे पळत आला आणि पपांच्या पँटीत एक चिठ्ठी सापडल्याचे सांगितले. त्याने ती चिठ्ठी आजोबाकडे दिली.

 

त्यामध्ये लिहिलेल्या माझ्या पत्नीचे लफडे पांडू बरोबर होते मी अनेक वेळा सांगितलं पण तिने ऐकले नाही राधा आक्का आणि आप्पा यांनीही सांगितले, त्यांचेही ऐकले नाही. म्हणून मी यास कंटाळून नैराश्य आल्याने औषध पिऊन आत्महत्या केली आहे. यामुळे सून शुभांगी नेताजी भुसे,पांडुरंग द्रोणाचार्य भुसे,आप्पा रामहरी भुसे (तिघेही रा. औंढी ता. मोहोळ ) मृताची सासू राधा अक्का जीवनाथ डुकरे ( रा. सोलापूर) त्यांच्याविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केला. अद्यापि यातील संशयित एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

Tags: #Husband's #suicide #wife's #immoral #relationship #case #filed #fourpeople #including #boyfriend #Solapur #Mohol#मोहोळ #सोलापूर #पत्नी #अनैतिक #संबंध #कंटाळून #पती #आत्महत्या #प्रियकर #चारजण #गुन्हा #दाखल
Previous Post

अठरा महिन्यांत सोलापूर पाणीटंचाई मुक्त करू; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Next Post

पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेसमोर मटकाफोड आंदोलन, तोंडाला काळे फासण्याचा इशारा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेसमोर मटकाफोड आंदोलन, तोंडाला काळे फासण्याचा इशारा

पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेसमोर मटकाफोड आंदोलन, तोंडाला काळे फासण्याचा इशारा

वार्ता संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697