सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या – ढिसाळ नियोजनामुळे शहरात वारंवार पिण्याच्या पाण्याची टंचाई होत आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी शहरात नाहीत. या पाणीटंचाईचा सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीनं आज पालिकेसमोर मडकी फोडून निषेध केला. Solapur, protest against drinking water in front of municipal corporation Solapur warning of black face
येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास संबंधितांना अधिकाऱ्यांना काळे फासु, असा इशाराही युवक काँग्रेसने दिला.
काल गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नावर लक्ष न घालता नवीन इमारती उद्गाटन याकडेच लक्ष दिले. राज्यकर्त्यांना पाणी प्रश्नाचं गांभिर्य नाही का? असा सवाल युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी उपस्थित केला.
प्रवेशद्वारासमोर नाकर्त्या भाजप आणि प्रसाशनाच्या विरोधात बोंबाबोंब करून मटकाफोड़ आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिक त्रस्त मंत्री उद्घाटनात व्यस्त, नाकर्त्या भाजप सरकारचा निषेध असो, पाणी दया नाही तर खुर्च्या खाली करा, अश्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी श्रीकांत वाडेकर, प्रविण जाधव, विश्वराज चाकोते,तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, शरद गुमटे, समीर काझी, दाऊद नदाफ, किरण राठोड, आकाश भोसले, निखील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पत्रकारांच्या गृहप्रकल्पास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, सहकार्याचे आश्वासन
सोलापूर : पत्रकारांसाठी साकारत असलेला गृहनिर्माण प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दिली.
गुरुवारी (ता. २५), फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. महसूल भवनाच्या उद्घाटनानंतर ते हुतात्मा स्मृती मंदिर येथे महापालिकेने आयोजित केलेल्या कामासाठी मार्गस्थ होत असताना भाजपचे ‘प्रदेश सदस्य शहाजी पवार यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी विजापूर रस्त्यावर पत्रकारांसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाला धावती. भेट दिली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शहाजी पवार हे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊ आणि शासन या प्रकल्पाच्या परिपूर्तीसाठी निश्चितच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिपूजन समारंभाला आपण उपस्थित होतो, याची आठवण विखे-पाटील यांनी यावेळी करून दिली.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकारांसाठी मंजूर केलेला हा राज्यातील पहिला गृहप्रकल्प असून त्याचे भूमिपूजन आपल्याच हस्ते झाले आहे. या घराच्या चाव्याही आपल्याच हस्ते आम्हाला मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.