सोलापूर – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेस अडवून हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. ही घटना रंगभवन परिसरातील गणेश चेंबर जवळ आज शनिवारी (ता.27) दुपारच्या सुमारास घडली. Blocked the bike and beat the woman with a hockey stick; Incident at Rang Bhavan premises Ganesh Chamber Solapur
संदेशा सागर मोरेश्वर (वय २७ रा. रंगभवन,द फर्स्ट चर्चच्या पाठीमागे ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी अभिजीत गायकवाड (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास संदेशा मोरेश्वर या आपल्या दुचाकीवरून औषध आणण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. गणेश चेंबर जवळ अनोळखी सहा जणांनी त्यांची दुचाकी अडविली. त्यांना हॉकी स्टिकने मारहाण केली . अशी नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.
● चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
सोलापूर : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत साधना सचिन दलभंजन (वय-४२,रा.साखर पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी साधना यांचे २०१२ मध्ये सचिन दलभंजन याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्याच्या कुटुंबियांनी साधना यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांचे डोके भिंतीवर आपटले. शिवाय त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिले. शिवाय शेअर मार्केट मध्ये गुंतवण्यासाठी १ लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केला,अशा आशयाची फिर्याद साधना यांनी दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून पती सचिन दलभंजन, विजया दलभंजन, नितीन दलभंजन, दीपाली दलभंजन (सर्व रा.गोदावरी अपार्टमेंट,सिंहगड रोड,पूणे) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचा तपास पोलीस नाईक मस्के करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगून महिलेला दीड लाखाला फसवले
सोलापूर : क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे भासवून महिलेच्या खात्यातून दीड लाख रूपये काढून घेत महिलेला फसवले.
याप्रकरणी प्रभा ज्ञानेश्वर कदम (वय-४५,रा. विजापूर नाका) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी कदम यांना आपले क्रेडिट कार्ड सुरू करायचे होते. याच दरम्यान त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर संबंधिताने त्यांच्या खात्यातील १ लाख ४२ हजार ५९४ रूपये काढून घेतले. ही घटना १ जून २०२२ मध्ये घडली. याप्रकरणी प्रभा कदम यांनी तब्बल अकरा महिन्यांनी फिर्याद दिली आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हनपुडे पाटील करत आहेत.