मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडीत १६ -१६ – १६ हा फॉर्म्युला ठरत असला तरी ठाकरे गटाने २३ जागांवर दावा केल्याने आघाडीत त्यांचा फॉर्म्युला’ बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर इकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Mahavikas Aghadi’s ‘formula’ and alliance’s ‘Bijat Ghongde’: The battle for Lok Sabha seats
कारण, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा केला आहे. यावर पक्षविस्ताराच्या बाबतीत कायम आक्रमक असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिंदे गटाला २२ जागा दिल्या तर ‘भाजपचे मिशन ४५’ चे काय ?, हा प्रश्न भाजप नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे युतीचे ‘घोंगड’ भिजतच पडलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, ‘लोकसभेच्या २२ जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी १३ खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकाणी उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी केली जाईल.
लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.’ तसेच खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी १३ विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा झाली. लोकसभेच्या या १३ जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होईल, असेही सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व लोकसभा मतदारसंघातील विकास राजकारण्यांचा ‘मेंदू कुठे गेलाय ?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजप आणि शिवसेना यांनी २०१९ साली युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपने २५ जागा लढवून २३ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १८ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या अनुक्रमे २५ आणि १९ जागा लढवल्या होत्या. तर चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते.
दरम्यान महाविकास आघाडीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षात समसमान जागावाटपावर चर्चा होत असली तरी ते ठाकरे गटाला मान्य नाही. त्यांनी २३ जागांवर दावा केला आहे. यात महाविकास आघाडीत धुसफुस होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या २ व ३ जूनला काँग्रेस राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मुंबई आढावा घेणार आहे.
● सापत्नाची वागणूक : किर्तीकर
भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे खळबळजनक वक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप – शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली होती.
मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
● किर्तीकर असे बोललेच नाहीत : फडणवीस
‘शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपाबद्दल केलेल्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं वक्तव्य गजानन कीर्तिकरांनी केलं आहे.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (२६ मे) अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा गजानन कीर्तिकरांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन कीर्तिकरांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या आहेत’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.