सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात सोलापूर शहराचा दौरा केला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे येत्या गुरुवारी (ता. १ जून ) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांच्या लग्न समारंभाला ते उपस्थिती दर्शवणार आहेत. After Devendra Fadnavis, Ajit Pawar visits Solapur; Dilip Mane will attend the wedding ceremony in Solapur
दिलीप माने यांचा सध्या तरी त्यांचा कोणताही राजकीय कार्यक्रम ठरला नाही मात्र अजितदादांचा हा दौरा आहे, गाजणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहॆ. आगामी लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू होत आहे. सर्वांचा फोकस यंदा सोलापूरवर दिसत आहे.
या मे महिन्यात विविध पक्षातील लिकेज नेत्यांनी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात हजेरी लावली आहे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूर, सांगोला व सोलापूर शहरातील कार्यक्रमांना हजेरी लावून जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उत्साह निर्माण केला. तसेच अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला. या दौऱ्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घ्यायचा का याबद्दलही चर्चा झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शरद पवारांच्या या दौऱ्यानंतर शहर काँग्रेसनेही मेळावा घेत राष्ट्रवादीला सोलापूर मतदारसंघासह माढा लोकसभा मतदारसंघावर ही दावा ठोकला. शहर काँग्रेसच्या या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहिले. मात्र हा दौरा गाजला तो नाना पटोले यांच्या स्वभावाच्या भाषेमुळे.
नाना पटोले यांच्या मेळाव्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूरचा दौरा केला. बावनकुळेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोलापुरात हजेरी लावून शासकीय कार्यक्रमांसह भाजपचा मेळावा घेतला. या दौऱ्यातही फडणवीस यांनी भाजप शिवसेना युती सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व जागा एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली , तसेच कार्यकर्त्यांना महापालिका जिल्हा परिषदेवरही भाजपचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. त्यानंतर कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सोलापुरात येऊन भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
शिवाय केंद्रीय मंत्री अजय सिंह हे सुद्धा माढा दौऱ्यावर आहेत त्यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूरच्या राजकारणातील प्रमुख तीन पक्षांचे वरिष्ठ नेते सोलापुरात येऊ लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक तयारीचा उत्साह संचारू लागला आहे. आता जून महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एक रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सोलापुरात येणार आहेत.
माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांचा एक जून रोजी विवाह आहे. त्या विवाह समारंभाला अजितदादा उपस्थिती दर्शवणार आहेत. सध्या तरी त्यांचा कोणताही राजकीय कार्यक्रम ठरलेला नाही मात्र अजितदादा यांच्या या दौऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहॆ.